PPF Scheme : अलीकडे भारतात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात मोठी मंदी पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा मोराल डाऊन झाला आहे. अनेक गुंतवणूकदार आता शेअर मार्केटकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.
अशा परिस्थितीत, अनेकांच्या माध्यमातून सुरक्षित गुंतवणुकीचा शोध घेतला जात आहे. अनेकजण बँकेच्या एफडी योजनेत तर काहीजण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. सीनियर सिटीजन आणि महिलांच्या माध्यमातून या योजनांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जात आहे.

दरम्यान आज आपण सुरक्षित गुंतवणुकीच्या अशाच एका लोकप्रिय योजनेची माहिती पाहणार आहोत. आज आपण अशा एका सरकारी बचत योजनेची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना फक्त व्याजातूनच 14 लाख रुपये मिळणार आहे.
कोणती आहे ती योजना?
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम असून यामध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. ही योजना पंधरा वर्षांची आहे. म्हणजेच या योजनेचा लॉक इन पिरेड हा पंधरा वर्षांचा आहे.
म्हणजेच तुम्ही पंधरा वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेतून पूर्ण रक्कम काढू शकत नाहीत. या योजनेच्या गुंतवणुकीबाबत बोलायचं झालं तर यात दरवर्षी कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. तसेच किमान पाचशे रुपयांपासून गुंतवणूक करता येते.
या योजनेतून गुंतवणूकदारांना 7.10% दराने परतावा सुद्धा दिला जातोय. महत्त्वाचे म्हणजे ही योजना पाच-पाच वर्षांनी एकस्टेन्ड सुद्धा करता येते. ज्या गुंतवणूकदारांना या योजनेत गुंतवणूक करायची असेल ते पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेत जाऊन पीपीएफ योजनेत खाते ओपन करू शकता.
कसे मिळणार 14 लाखाचे व्याज ?
जर एखाद्या गुंतवणूकदाराने पीपीएफ योजनेत आतापासून दरवर्षी एक लाख वीस हजार रुपयांची गुंतवणूक सुरु केली तर मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला 32 लाख 54 हजार 567 रुपयांची रक्कम मिळणार आहे. यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक ही फक्त 18 लाखाची राहणार आहे आणि उर्वरित 14 लाख 54,567 रुपये हे व्याज स्वरूपात गुंतवणूकदाराला रिटर्न मिळणार आहेत.