Prajkta Mali Farm House Rent : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी अलीकडेच कर्जत मध्ये एक सुंदर फार्म हाऊस खरेदी केला आहे. याचे व्हिडिओज त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. दरम्यान प्राजक्ता माळी यांनी खरेदी केलेला फार्म हाऊस लोकांना खूपच आवडला आहे.
खरंतर प्राजक्ता यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. याशिवाय लोकप्रिय मराठी टेलिव्हिजन शो महाराष्ट्राची हास्य जत्रा यामध्ये त्यांनी निवेदिका म्हणूनही काम केले आहे.
या टेलिव्हिजन शो मधून त्यांचे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे. यामुळे प्राजक्ता माळी यांची ओळख मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीं म्हणून होत आहे.
प्राजक्ता यांनी फक्त अभिनयातच हात आजमावला आहे असे नाही तर त्यांनी अभिनयासोबतच उद्योग व्यवसायाला सुरुवात केली आहे. त्यांनी प्राजक्ताराज हा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे.
यासोबतच त्यांनी एक सुंदर असे फार्म हाऊस देखील खरेदी केले आहे. याला त्यांनी प्राजक्तकुंज असे नाव दिले आहे. हे फार्म हाऊस कर्जत मध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे.
जर तुम्हीही कर्जत फिरण्याच्या तयारीत असाल आणि तुम्हाला तिथे राहण्यासाठी एक शानदार रिसॉर्ट हवे असेल तर प्राजक्ता माळी यांचे प्राजक्त कुंज हे फार्म हाऊस तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकते.
दरम्यान आता आपण प्राजक्त कुंज या फार्म हाऊस वर राहण्यासाठी किती खर्च येतो हे थोडक्यात जाणून घेणार आहोत.
किती खर्च येणार ?
मीडिया रिपोर्ट नुसार, आघाडीची मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या प्राजक्तकुंज या फार्म हाऊसवर राहण्यासाठी एका दिवसाला 15,000 पर्यंतचा खर्च करावा लागू शकतो.
यामध्ये तुमच्या जेवणाचा देखील खर्च समाविष्ट राहणार आहे. येथे सहा लोकांना आरामात राहता येऊ शकते. येथे तुम्हाला विविध गेम्स खेळता येऊ शकतात.
स्विमिंगसाठी उत्तम स्विमिंग पूल आहे. आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे. यामुळे जर तुम्ही कर्जतला गेलात तर येथे राहून निसर्गरम्य वातावरणाची अनुभूती घेऊ शकणार आहात.