Tata Share Price : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी टाटा समूहाचा शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या तमाम गुंतवणूकदारांसाठी खास करणार आहे. तुम्ही पण टाटा समूहाचे गुंतवणूकदार असाल तर नक्कीच आजची बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. टाटा ग्रुपची कंपनी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स यांच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. ट्रेडिंगदरम्यान स्टॉकमध्ये 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आणि शेअरने 363 चा इंट्राडे लो गाठला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घसरण कंपनीने प्रचंड नफा जाहीर केल्यानंतर झाली आहे. मात्र या नफ्यामागे असलेल्या विशेष कारणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून ब्रोकरेज संस्थांनीही सावधगिरीचा इशारा दिला आहे.
कंपनीचा तिमाही निकाल कसा राहिलाय?
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सने जाहीर केलेल्या निकालानुसार कंपनीला या तिमाहीत 76,170 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. हा नफा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 2,110% वाढ दर्शवतो. परंतु हा नफा मुख्यत्वे 82,616 कोटींच्या एकमुश्त प्रॉफिटमुळे झाला आहे. हा विशेष नफा वजा केल्यास कंपनीला प्रत्यक्षात 6,368 कोटींचा तोटा झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 3,056 कोटींचा नफा झाला होता, तर गत तिमाहीत कंपनीने 2,597 कोटींचा नफा कमावला होता. त्यामुळे वास्तविक कार्यक्षमतेत मोठी घसरण आढळत आहे.

मोतीलाल ओसवालचा सल्ला काय?
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल ने टाटा मोटर्सच्या स्टॉकवर ‘सेल’ (विक्री) ची शिफारस केली आहे. त्यांनी प्रति शेअर 312 रुपयाचे टारगेट प्राइस जाहीर केले असून हे सध्याच्या बंद भावापेक्षा सुमारे 20% कमी आहे. ब्रोकरेजनुसार, कंपनीच्या जग्वार लँड रोव्हर (JLR) विभागाचे प्रदर्शन अत्यंत कमकुवत राहिले आहे. या तिमाहीत जेएलआरचा EBITDA मार्जिन -1.6% इतका खाली आला आहे, जो अनेक वर्षातील सर्वात खराब स्तर मानला जात आहे.
जेएलआरसमोरील आव्हाने कायम
ब्रोकरेजनुसार, जेएलआरला साइबर हल्ला, उच्च टॅरिफ, कमी मागणी, आणि जोरदार डिस्काउंट्स देण्याची गरज या सर्व कारणांमुळे मोठा फटका बसला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनी अंदाजे 20,000 वाहनांचे उत्पादन/विक्री करू शकली नाही, तर तिसऱ्या तिमाहीत आणखी 30,000 वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. चीन, अमेरिका आणि युरोपसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये मागणी कमी असल्याने परिस्थिती लवकर सुधारेल असे दिसत नाही. या सर्व कारणांमुळेच ब्रोकरेजने स्टॉकविषयी सावध भूमिका घेत ‘सेल’ सल्ला दिला आहे.












