वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरील कर्ज फेडण्याची जबाबदारी मुलांवर असते का ? कायदा काय सांगतो ?

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर असणारे कर्ज फेडण्याची जबाबदारी कोणाची असते ? तुम्हालाही असाच प्रश्न पडला आहे का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. 

Published on -

Property Law : आपल्यापैकी अनेकजण संसाराच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज काढत असतात. पण कर्ज परतफेडीबाबतचे नियम अनेकांना माहिती नसतात. दरम्यान आज आपण कर्ज परतफेडीचे असेच काही नियम थोडक्यात समजून घेणार आहोत. खरेतर, अनेकांच्या माध्यमातून व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याने घेतलेले कर्ज फेडण्याची जबाबदारी मुलांवर असते का ? असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

तसेच, व्यक्तीच्या मृत्यूनंतर कर्ज परतफेडीसाठी त्यांची मालमत्ता धोक्यात येऊ शकते का ? याबाबतही अनेकांच्या मनात गोंधळ असतो. दरम्यान आज आपण याच बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासंदर्भात कायद्यात काय तरतूद आहे? याबाबतची माहिती आता आपण जाणून घेऊयात. 

काय सांगतो कायदा? 

कायद्यानुसार, आई वडिलांच्या  निधनानंतर त्यांच्या मुलांवर कर्ज फेडण्याची वैयक्तिक जबाबदारी नसते. जर मुलांनी मयत आई-वडिलांच्या कर्जासाठी सह-कर्जदार किंवा हमीदार म्हणून स्वाक्षरी केलेली नसेल तर असे कर्ज फिरण्याचे जबाबदारी मुलांवर नसते.

म्हणजेच, केवळ वारस असल्यानं मयत झालेल्या व्यक्तीचे कर्ज फेडावं लागेल, असं कायद्यात कुठेच लिहलेलं नाही. पण, त्याचवेळी बँकांना मृत व्यक्तीच्या मालमत्तेमधून आपल्या कर्जाची रक्कम वसूल करण्याचा अधिकार देखील आहे. बँका किंवा वित्तसंस्था मयत झालेल्या व्यक्तीच्या मालमत्तेतून आपली थकीत रक्कम वसूल करू शकतात.

जाणकार लोक असे सांगतात की जर एखाद्या मृत व्यक्तीकडे एक लाख रुपयांचे कर्ज असेल आणि त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची मालमत्ता असेल तर अशा प्रकरणात मालमत्ते मधून संपूर्ण रक्कम सुरू केली जाते.

तसेच जर कर्ज एक लाख रुपये असेल आणि मालमत्ता एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर अशावेळी मालमत्तेची जेवढी रक्कम आहे तेवढी रक्कम बँका वसूल करतात आणि उर्वरित रक्कम माफ केली जाते.

बँकेकडून दिले जाणारे पर्सनल लोन, शैक्षणिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसारख्या असुरक्षित कर्जांमध्ये कोणतीही मालमत्ता गहाण ठेवलेली नसते. अशा वेळी फक्त मृत व्यक्तीच्या मालमत्तेतूनच बँकांना वसुली करावी लागते.  

गृह कर्जाच्या बाबतीत वेगळे आहेत नियम 

दुसरीकडे गृह कर्ज आणि वाहन कर्जाच्या बाबतीत थोडीशी परिस्थिती वेगळी राहते. कारण, गृहकर्ज आणि वाहन कर्ज ही सुरक्षित कर्जं असतात म्हणजे गृह कर्ज आणि वाहन कर्ज घेतांना संबंधित मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली जाते.

आता जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्या व्यक्तीच्या वारसांना ती मालमत्ता म्हणजेच घर असेल तर घर आणि कार असेल तर कार ठेवायची असेल तर अशावेळी वारसांना कर्ज आपल्या डोक्यावर घ्यावे लागते आणि कर्जाची सर्व रक्कम भरावी लागते.

नाहीतर मग बँकेकडून ती मालमत्ता ताब्यात घेतली जाते आणि लिलाव करून त्यांचे पैसे वसूल केले जातात. तसेच जर वारस कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी हमीदार किंवा सह-कर्जदार असेल, तर अशा प्रकरणात मात्र त्याच्यावर संपूर्ण कर्जाची जबाबदारी येते. म्हणूनच कोणत्याही कर्जासाठी हमीदार होताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!