Property News : मुंबईतही आपले घर असावे असे स्वप्न अनेकांनी पाहिलंय. तुमचेही मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी म्हाडा प्राधिकरणाकडून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांनी पुढील पाच वर्षांत लाखो नवीन घरे बांधण्याची योजना आखली आहे.
पुढील पाच वर्षात प्राधिकरणाकडून शहरात सात लाख नवीन घर तयार केली जाणार आहेत. मुंबई शहर व आजूबाजूच्या परिसरात असणारा घरांचा शॉर्टेज दूर करण्यासाठी प्राधिकरणाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

प्राधिकरणाच्या या नव्या उपक्रमामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात घर खरेदी करता येणार आहे. या उपक्रमानंतर लाखो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. लोकांना परवडणाऱ्या किमतीत घरांची उपलब्धता होणार असल्याने हा प्रकल्प मोठा गेम चेंजर ठरणार असा विश्वास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय.
म्हाडा उपाध्यक्ष तसेच CEO संजीव जयस्वाल यांनी येत्या पाच वर्षांत मुंबई मेट्रोपॉलिटन प्रदेशात 7 लाखाहून अधिक घरे बांधली जातील अशी माहिती दिलीये. तसेच या घरांपैकी शहरात जवळपास साडेपाच लाख घरे तयार होणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार म्हाडा मुंबई मंडळाच्या माध्यमातून ही घरे वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत तयार केली जातील. वेगवेगळ्या योजनांअंतर्गत विकसित केली जाणारी ही लाखो घरे प्राधिकरणाकडून लॉटरीद्वारे विकली जाणार आहेत.
या भागात तयार होणार लाखों घरे
जीटीबी कॉलनी सायन
अंधेरी एसव्हीपी नगर
गोरेगाव मोतीलाल नगर
कामाठीपुरा
या भागांमध्ये म्हाडा मुंबई मंडळाच्या माध्यमातून पुनर्विकास प्रकल्प योजने अंतर्गत येत्या पाच सात वर्षात दोन लाख घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच सर्वसमावेशक गृहनिर्माण प्रकल्प, पुनर्विकास प्रकल्प आणि पंतप्रधानांच्या अनुदान प्रकल्प (पीएमजीपी) कॉलनीचे नूतनीकरण अंतर्गत सुद्धा अनेक घरे विकसित होणार आहेत.