10% मुंबई आहे बापाची ! ‘हे’ कुटुंब आहेत मुंबईतील सर्वात मोठे जमीनदार, 3400 एकर जमिनीचे मालक 

Published on -

Property News : भारत हा वेगाने विकसित होतोय. देशाची अर्थव्यवस्था सातत्याने प्रगती करताना दिसत आहे. सद्यस्थितीला भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पण लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ असा विश्वास अर्थतज्ञांनी व्यक्त केलाय.

दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेत ग्रामीण तसेच शहरी भागाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि शहरी भागातील उद्योजक देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. देशाच्या विकासात मुंबईचा मोठा वाटा आहे.

हे देशातील सर्वाधिक श्रीमंत शहर आहे. देशाची राजधानी आहे. येथे तुम्हाला अनेक सिनेसृष्टीतील कलाकार, उद्योजक, राजकारणी वास्तव्याला पाहायला मिळतील. दरम्यान आज आपण मुंबईतील सर्वात मोठ्या जमीनदाराची माहिती पाहणार आहोत.

मुंबईतील दहा टक्के जमिनीचे मालक  

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने अलीकडेच एक महत्त्वाचे सर्वेक्षण केले होते. यातून मुंबईतील 20 टक्के जमीन काही निवडक लोकांकडेचं आहे असे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या 20 टक्क्यांपैकी निम्मी जमीन एकट्या गोदरेज कुटुंबाच्या नावावर आहे.

सर्वेक्षणानुसार गोदरेज कुटुंबाकडे एकूण तीन हजार चारशे एकर जमीन आहे. या जमिनीचे मूल्य 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पण गोदरेज कुटुंबाकडे असणाऱ्या जमिनीवर काही राखीव जागा सुद्धा आहेत. यामुळे काही मर्यादा आहेत.

पण या मर्यादेसह जमिनीचे मूल्यमापन केले तरीसुद्धा जमिनीचे मूल्य 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 100 वर्षांपासून हा परिवार व्यवसाय करतोय. स्वातंत्र्यपूर्वी या परिवाराने व्यवसायाची सुरुवात केली होती.

ग्रुपची स्थापना अर्देशीर व पिरोजशा बुर्जोरजी गोदरेज या दोन्ही भावंडांनी केली होती. हा समूह रियल इस्टेट, ग्राहक उत्पादन व औद्योगिक अभियांत्रिकीसह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्यावर्षी गोदरेज कुटुंबाने व्यवसायाचे विभाजन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News