Property Rights : भारतीय कायद्याने मुलांना आणि मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार दिलेले आहेत. वडिलांच्या संपत्तीत मुलींच्या अधिकाऱ्यांबाबत संपत्ती विषयक कायद्यांमध्ये सखोल माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान आज आपण लग्न झाल्यानंतर किती वर्षे मुलीचा आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार राहतो याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर अनेकांच्या माध्यमातून हा सवाल उपस्थित केला जात होता.

मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो मात्र लग्न झाल्यानंतर तिला किती वर्ष आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार राहतो? याबाबत कायद्यात काय तरतूद करून देण्यात आली आहे? असे प्रश्न उपस्थित होते आणि आज आपण याच प्रश्नांच्या संदर्भातील माहिती जाणकार लोकांकडून जाणून घेणार आहोत.
संपत्ती विषयक कायदा काय सांगतो?
भारतात, 1965 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा मंजूर करण्यात आला होता. या कायद्यानुसार देशातील मालमत्ता विभागणीच्या नियम स्पष्ट झालेत. देशातील हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख यांच्यातील मालमत्ता विभागणी, उत्तराधिकार आणि वारसा यासंबंधीच्या सर्व तरतुदी या कायद्यात नमूद आहेत.
मात्र 2005 पर्यंत वडिलोपार्जित संपत्ती मध्ये लग्न झालेल्या मुलींना अधिकार दिला जात नव्हता. परंतु 2005 मध्ये कायद्यात संशोधन करण्यात आले आणि त्यानंतर अविवाहित मुलींप्रमाणेच विवाहित मुलींना देखील वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार देण्याचा निर्णय झाला.
मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित असो तिला तिच्या भावंडांच्या प्रमाणेच वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार राहील असे कायद्याने स्पष्ट केले. 2005 पूर्वी, हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या नियमांनुसार, केवळ अविवाहित मुलींनाच अविभाजित हिंदू कुटुंबाचे सदस्य मानले जात असे.
मुलीचे लग्न होताच, कायद्यानुसार, मुलगी हिंदू अविभाजित कुटुंबाचे सदस्य राहत नसे. त्यामुळे 2005 च्या आधी मुलीचे लग्न झाले की तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत कोणताच हिस्सा मिळत नव्हता.
त्यामुळे मुलींच्या अधिकारांचे हनन होत असे आणि हेच कारण होते की 2005 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि त्यानुसार विवाहित मुलींना सुद्धा वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळू लागला.
लग्न झाल्यानंतर किती वर्षे मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो?
2005 नंतर आता लग्न झालेल्या मुलीला सुद्धा अविवाहित मुलींप्रमाणे मालमत्तेत हक्क दिला जातो म्हणजेच या हक्कात कोणताच बदल होत नाही. पण लग्न झाल्यानंतर किती वर्षे मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो?
तज्ञ सांगतात की जोपर्यंत मुलगी हयात आहे तोपर्यंत तिला वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगता येतो. किती वर्ष लग्न झालेल्या मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार राहील याबाबत कायद्यात कोणतीही तरतूद केलेली नाही.
म्हणजे मुलीला मालमत्तेवर किती काळ हक्क राहील हे ठरवणारी कोणतीही कालमर्यादा नाही. या कायद्यावरून हे स्पष्ट होते की, मुलगी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळू शकतो. पण हा नियम फक्त वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबत लागू होतो, स्वकष्टाने कमावलेल्या संपत्तीच्या बाबत वेगळे नियम लागू होतात.