Property Rights : संपत्तीवरून कुटुंबात होणारे वाद आणि वादाचे मोठ्या भांडणांमध्ये झालेले रूपांतर तुम्ही पाहिलंच असेल. अनेकदा भावंडांमध्ये संपत्तीवरून वाद वाद होतात. अलीकडे प्रॉपर्टी चे भाव गगनाला भिडले असल्याने मालमत्तेशी संबंधित वादांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
पण या वादांमागील प्रमुख कारण म्हणजे संपत्तीविषयक कायद्यांची अपुरी माहिती. वारसाहक्क, नॉमिनी, वडिलोपार्जित व स्वतःच्या कमाईची मालमत्ता यातील फरक न समजल्याने अनेक कुटुंबांत संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद वाद होत असतात.

यामुळे कुटूंबात तणावाचे वातावरण निर्माण होते. दरम्यान आज आपण संपत्ती विषयक कायद्यामध्ये एका महत्त्वपूर्ण बाबीची माहिती पाहणार आहोत. कोणत्या प्रकरणात भावा ऐवजी मालमत्तेत बहिणीला प्राधान्य मिळते याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.
खरेतर विवाहित बहीण भावाच्या मालमत्तेवर दावा करू शकते का ? हा प्रश्न अनेक जण विचारत असतात. म्हणून यासंदर्भात कायदा नेमका काय सांगतो हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत.
कायदे तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पालकांनी स्वतःच्या कमाईतून उभारलेली मालमत्ता कोणत्या मुलाला किंवा मुलीला द्यायची याचा संपूर्ण अधिकार स्वतः पालकांनाच असतो. म्हणजेच पालकांनी स्वतःच्या कष्टाने कमावलेली संपत्ती ते कोणालाही देऊ शकतात. अशा संपत्तीवर मुलांना दावा ठोकता येत नाही.
ते इच्छेनुसार मालमत्ता मुलगी किंवा बहीण यांच्याकडे देऊ शकतात. अशा प्रसंगी मुलगा म्हणजेच भाऊ या निर्णयाला विरोध करू शकत नाही. जर पालकांनी घर, जमीन किंवा इतर संपत्ती विवाहित मुलीच्या नावावर केली असेल, तर भावाकडून असा दावा कायदेशीरदृष्ट्या टिकू शकत नाही.
पण वडिलोपार्जित संपत्तीत चित्र पूर्णपणे वेगळे असते. पूर्वजांकडून मिळालेल्या संपत्तीत मुलगा आणि मुलगी दोघांचाही समान हिस्सा असतो. पालक जिवंत असोत अथवा निधन झालेले असो, बहीण आणि भाऊ समान हक्काने मालमत्तेत वाटा मागू शकतात. त्यामुळे वडिलोपार्जित मालमत्तेत भावाकडे संपूर्ण हक्क आहे असा समज चुकीचा ठरतो.
यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विवाहित बहीण भावाच्या स्वतःच्या कमाईच्या मालमत्तेवर दावा करू शकते का ? हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, 2005 नुसार, जर एखादा व्यक्ती मृत्युपत्र न बनवता मयत पावला आणि क्लास-I वारसदार (पत्नी, मुलगा, मुलगी, आई) हयात नसतील, तर बहिण क्लास-II वारसदार म्हणून संपत्तीवर दावा करू शकते.
म्हणजेच विशिष्ट परिस्थितीत विवाहित बहीणीला भावाच्या संपत्तीवर हक्क मिळू शकतो. एकंदरीत पाहता, मालमत्तेचे स्वरूप (वडिलोपार्जित की स्वयं-अर्जित), मृत्यूपत्राची उपलब्धता आणि वारसदारांची यादी यानुसार हक्क निश्चित होतो.
त्यामुळे संपत्तीवाटपात पारदर्शकता राखण्यासाठी आणि कुटुंबातील मतभेद टाळण्यासाठी योग्य कायदेशीर मार्गदर्शन व जागरूकता अत्यावश्यक आहे. जाणिवपूर्वक निर्णय घेतल्यास कौटुंबिक एकोपा टिकवता येतो आणि वादांची शक्यता कमी होते.













