Property Rights : आपल्या देशात संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद-विवाद होतात. अनेकदा वाद विवाद भांडणांमध्ये परावर्तित होतात. काही प्रकरणांमध्ये तर संपत्ती वरून खून पडण्याच्या घटना देखील महाराष्ट्रात घडल्या आहेत. लोकांना अनेकदा मालमत्तेवरील हक्क आणि दाव्यांच्या नियमांची कायदेशीर समज आणि ज्ञान नसतं.
त्यामुळे संपत्तीवरून सर्वाधिक वाद विवाद होतात. म्हणून देशातील प्रत्येक नागरिकाला मालमत्तेशी निगडीत नियम आणि अधिकारांची योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान आज आपण मालमत्तेशी निगडित अशाच एका कायद्याची आणि अधिकाराची योग्य माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरंतर अनेकांच्या माध्यमातून आजोबाच्या संपत्तीत नातवाचा किती अधिकार असतो, आजोबाच्या संपत्तीत नातवाला हिस्सा मिळतो का असे काही प्रश्न उपस्थित केले जातात. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आजोबाच्या संपत्तीत नातवाचा अधिकार असतो का
या प्रश्नाचे उत्तर ‘हा’ आणि ‘नाही’ असे दोन्हीही आहेत. खरे तर आजोबाच्या वडीलो पार्जित संपत्तीत नातवाचा अधिकार असतो यात तीळ मात्र ही शंका नाही.
वडिलोपार्जित मालमत्तेवर नातवाचा कायदेशीर हक्क असल्याने जर याबाबत काही वाद उद्भवला किंवा नातवाला कायदेशीर हक्क मिळाला नाही तर अन या प्रकरणात जर कोणाला आपत्ती असेल तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला जाऊ शकतो.
दिवाणी न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर मग न्यायालयाच्या माध्यमातून योग्य व्यक्तीला संपतीत कायदेशीर अधिकार दिला जातो. पण जर आजोबांनी स्वतःच्या कष्टानं कमावलेली संपत्ती असेल तर यावर नातवाचा कायदेशीर अधिकार राहत नाही.
अशी संपत्ती आजोबा त्यांना पाहिजे त्या व्यक्तीला देऊ शकतात. अर्थातच अशा प्रकरणात आजोबा त्यांच्या मनाने ही संपत्ती नातवाला देऊ शकतात किंवा मग त्याला अधिकारी नाकारू शकतात.
जर, आजोबाच्या नावे स्वतःच्या कष्टाने कमावलेली संपत्ती असेल आणि आजोबांचं मृत्यूपत्र बनवलेलं नसेल आणि त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या तात्काळ किंवा प्रथम प्राधान्यानुसार जो कायदेशीर वारस असेल त्याला ही संपत्ती दिली जाते. पत्नी, मुलगा किंवा मुलगी हे कायदेशीर वारस अशा मालमत्तेवर हक्क सांगू शकतात.