Pune आणि पिंपरी-चिंचवडकरांनो ‘या’ भागात 5 एकर जमिनीवर नवीन गृहप्रकल्प तयार होणार ! महापालिका किती हजार घरे बांधणार ?

पिंपरी येथील रावेत येथे तयार होणारा गृह प्रकल्प नुकत्याच काही दिवसांपूर्वी रद्द करण्याचा निर्णय झाला होता. या गृह प्रकल्पातून 934 घरे विकसित केली जाणार होती. दरम्यान रावेत येथे आता नवीन गृहप्रकल्प तयार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून यासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू करण्यात आलीये आणि लवकरच याबाबतची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Published on -

Pune And Pimpri News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना घरे बांधून दिली जात आहेत. या योजनेतून देशात अनेक ठिकाणी गृह प्रकल्प तयार होत आहेत. महाराष्ट्रात सुद्धा आतापर्यंत अनेक गृहप्रकल्प तयार झाले आहेत.

दरम्यान पिंपरी येथील रावेत येथे तयार होणारा गृह प्रकल्प नुकत्याच काही दिवसांपूर्वी रद्द करण्याचा निर्णय झाला होता. या गृह प्रकल्पातून 934 घरे विकसित केली जाणार होती. पण या रद्द झालेल्या गृह प्रकल्पातील काही लाभार्थ्यांना किवळे येथील गृहप्रकल्पातून खाजगी विकासकांकडून मिळालेल्या 750 सदनिकांचा ताबा दिला जाणार आहे.

दरम्यान रावेत येथे आता नवीन गृहप्रकल्प तयार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून यासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू करण्यात आलीये आणि लवकरच याबाबतची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

यासाठी जवळपास 180 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च केला जाईल अशीही माहिती हाती आली आहे. दरम्यान आता आपण रावेत येथे आधीचा गृहप्रकल्प का रद्द झाला आणि नवीन गृह प्रकल्प कसा राहणार याबाबतचा संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत.

प्रकल्प रद्द का झाला होता ?

खरे तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरुवातीला चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी आणि रावेत येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत साडेतीन हजाराहून अधिक घरे बांधण्याची तयारी केली होती. यातील रावेतमधील 934 घरांची लॉटरी काढून त्यांचे वाटप सुद्धा करण्यात आले होते.

यासाठी लाभार्थ्यांनी महापालिकेला शुल्क देखील भरले होते. या प्रकल्पासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये निविदा काढली गेली होती अन मे 2019 मध्ये बांधकामांचे आदेश देण्यात आले होते. यासाठी महापालिकेने जवळपास 80 कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी दाखवली होती.

मात्र, रावेतमधील जमिनीचा ताबा मिळविण्यात महापालिकेला अपयश आले अन प्रकल्पाच्या कामात पुढे काहीच प्रगती होऊ शकली नाही. अशातच एका स्थानिक रहिवाशाने या प्रकल्पाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिकात दाखल केली आणि यामुळे महापालिकेला हा प्रकल्प थांबवण्याचे आदेश देण्यात आले.

पुढे उच्च न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळून लावली अन या प्रकरणात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सर्वोच्च न्यायालयाने मग महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बांधकाम साहित्याचे दर वाढले आहेत. मजुरी सुद्धा वाढली आहे, दरम्यान वाढत्या खर्चामुळे महापालिकेने हा प्रकल्प रद्द केला.

नवा गृहप्रकल्प कसा राहणार ?

आता रावेत येथे नवीन गृह प्रकल्प विकसित केला जाणार आहे. यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र या गृह प्रकल्पातील घरांच्या किमती आधीच्या किमतीपेक्षा अधिक राहण्याचे शक्यता आहे. आधी वन बीएचके घरासाठी साडेसात लाख रुपये लागत होते पण आता त्याच घरासाठी 9 ते साडेनऊ लाख रुपये लागणार आहेत.

रावेत येथील गृहप्रकल्प अडीच हेक्टर जमिनीवर उभारला जाणार आहे. या प्रकल्पात पाच इमारती विकसित केल्या जातील आणि यात कमाल 1000 घरे तयार होणार आहेत. प्रकल्पासाठी 180 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च केला जाईल अशी शक्यता आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अर्थसहाय्य केलं जाणार आहे. यासाठी तीन ते चार महिन्यांचा प्रक्रिया कालावधी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe