Pune APMC Application : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी एक भन्नाट ॲप्लिकेशन विकसित केल आहे. पुणे एपीएमसी असं या एप्लीकेशनच नाव आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये आलेल्या शेतीमालाची आवक, जावंक, इत्यादी इत्यंभूत माहिती मिळणार आहे. या ॲप्लिकेशनचा शेतकऱ्यांना कामगारांना तसेच व्यापाऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा बाजार समिती प्रशासनाने ठोकला आहे.
हे ॲप्लिकेशन प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांसाठी लॉन्च करण्यात आले आहे. हे पुणे एपीएमसी अँप्लिकेशन माजी पणन संचालक सुनील पवार यांच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे. यां प्रसंगी इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान आज आपण या एप्लीकेशन मध्ये कोणकोणत्या सुविधा राहणार आहेत आणि याचा शेतकऱ्यांना तसेच इतर लोकांना काय फायदा होणार आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

या अँप्लिकेशनचा नेमका फायदा काय?
या ॲप्लिकेशनच्या मदतीने बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी, वाहतूकदार-हुंडेकरी, तोलणार-मापाडी, आडते हे सर्व एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आता याचा फायदा बर नेमका काय होईल हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की यामुळे शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी एप्लीकेशनमध्ये लॉगिन करून शेतमाल, वाहतूकदार, अडत्यांची निवड करू शकणार आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सोयीचे होणार आहे. विशेष बाब अशी की याच्या मदतीने शेतकरी स्वतः शेतमालाची आवक देखील नोंदवू शकणार आहेत. आता एप्लीकेशन मध्ये शेतकऱ्यांनी नोंद केलेली आवक ही वाहतूकदार तपासणार आणि मग कायम करणार आहेत. अन मग तोलणार-मापाडी अडत्याकडे आलेली आवक तपासून त्याचे वजन आणि बाजार भाव यांची माहिती सदर एप्लीकेशनमध्ये भरण्याचे काम करणार आहेत.
हे काम झाल्यानंतर बाजार समितीमध्ये होणाऱ्या शेतमालाच्या आवकेची पूर्वकल्पना येणार आहे. विशेष म्हणजे एप्लीकेशनमुळे बाजार समितीमध्ये झालेल्या व्यवहाराची माहिती सर्वांना पारदर्शकपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यामुळे बाजार समिती प्रशासन आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असं जाणकारांनी सांगितला आहे.
त्यामुळे बाजार समितीमध्ये होणारी अक्च्युअल आवक इतरांना देखील समजणार आहे. शिवाय या एप्लीकेशनच्या मदतीने बाजार समिती प्रशासनात होणाऱ्या व्यवहारात पारदर्शकता येणार असल्याचा दावा केला जात आहे. निश्चितचं हे ॲप्लिकेशन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, अडत्यांना मोठे फायदेशीर ठरणार आहे.