Pune-Aurangabad Expressway : महाराष्ट्रात सध्या रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
यामध्ये एन एच आय अर्थातच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पुणे-छत्रपती संभाजी नगर ग्रीन फील्ड महामार्गाचा देखील समावेश आहे. या महामार्गामुळे पुणे अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यातील कृषी औद्योगिक आणि पर्यटन व्यवसायाला चालना लाभणार असल्याचा दावा केला जातो.
हा महामार्ग एकूण 268 किलोमीटर लांबीचा राहणार असून यासाठी दहा हजार 80 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान हा मार्ग अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीजवळून प्रस्तावित करण्यात आला आहे. एमआयडीसी जवळच्या बांबुर्डीमधून हा महामार्ग चालणार असल्याने सुपा एमआयडीसीला याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे परिसरात विकासाला चालना लाभणार आहे.
एमआयडीसी मधील कंपन्या, उद्योग यांना या मार्गाचा सर्वाधिक फायदा होणार असून यामुळे कृषी क्षेत्राला देखील बळकटी लाभणार आहे. सध्या स्थितीला अहमदनगर-पुणे हा चार पदरी महामार्ग सुपा एमआयडीसी लगत आहे. वास्तविक या महामार्गालगत जुनी एमआयडीसी उभारण्यात आली आहे. मात्र आता एमआयडीसी देखील मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. वाघुंडे, आपधूप, बाबुर्डी, पळवे, मसणे, सुलतानपूर या गावातील शिवारात एमआयडीसीचा आता विस्तार होत आहे.
विशेष बाब अशी की या परिसरात एमआयडीसीच्या माध्यमातून रस्ते वीज पाणी इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. के एस पी जी आणि मुंडा कॅरिअर यांसारख्या कंपन्या देखील आता या ठिकाणी विकसित झाल्या असून प्रत्यक्ष उत्पादन देखील सुरू झाले आहे. यामुळे हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला आहे. दरम्यान, जपानी पार्कमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आता कंपन्या येऊ लागल्या आहेत.
विशेष बाब अशी की वेगवेगळ्या फॅक्टरींची कामे आता तिथे होऊ लागली आहेत. दरम्यान पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या मते, या एमआयडीसीमुळे पारनेर सारख्या दुष्काळी ग्रस्त तालुक्याचा विकास होत आहे. नासिक पुणे औरंगाबाद रांजणगाव यांसारख्या एमआयडीसीपासून जवळच सुपा एमआयडीसी असल्याने कुशल अकुशल कामगार सहजरित्या या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. विशेष बाब म्हणजे स्थानिक शेतकरी बांधव देखील या एमआयडीसीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
दरम्यान आता या एमआयडीसी जवळून पुणे अहमदनगर औरंगाबाद ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला असल्याने यामुळे सुपा एमआयडीसीला अच्छे दिन येणार आहेत. दरम्यान या महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारला जात असला तरी देखील या महामार्गासाठी आवश्यक संपादनाची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
या महामार्गामुळे सुपा एमआयडीसी अंतर्गत कार्यरत असलेल्या उद्योगांना वाहतुकीसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती उद्योग जगताकडून पुरवली गेली आहे. निश्चितच हा महामार्ग औरंगाबाद, अहमदनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांसाठी जरी महत्त्वाचा असला तरी मात्र यामुळे सुपा एमआयडीसी चा अभुतपूर्व असा विकास यामुळे शक्य असल्याचे सांगितले जात आहे.