पुणे-बंगळूरु महामार्गावर ‘या’ भागात तयार होणार तीन नवीन उड्डाणपूल !

Pune – Bangalore Highway : पुणे-बंगळूरु महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या महामार्गावर नवीन 3 ठिकाणी उड्डाणपूल तयार केले जाणार असून याचा डीपीआर सुद्धा तयार झाला आहे. दरम्यान, आता याच तीन उड्डाणपूलांच्या प्रकल्पासंदर्भात महत्वाचे अपडेट हाती आले आहे.

खरे तर, पुणे – बेंगलोर महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान हीच वाहतूक कोंडी दूर व्हावी या अनुषंगाने या महामार्गावर काही महत्त्वाच्या भागात नवीन उड्डाणपूल विकसित केले जाणार आहेत. 

या ठिकाणी तयार होणार नवीन उड्डाणपूल 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूर महामार्गावरील कागल ते शेंद्रे या मार्गाच्या सहापदरीकरणाचे काम फारच हळूहळू होत आहे अन यामुळे नागरिकांमध्ये मोठे असंतोषाचे वातावरण आहे.

हे काम जलद गतीने व्हावे अशी नागरिकांची इच्छा आहे आणि याच पार्श्वभूमीवर नुकतीच एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीतून महत्वाची माहिती समोर आलीये.

ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सांगली फाटा ते उचगाव आणि कागल शहरातील उड्डाणपूल, तसेच पंचगंगा नदीवरील बास्केट ब्रिजसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आले आहेत.

महत्वाची बाब म्हणजे हे डीपीआर येत्या आठवड्यात केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असून, त्यानंतर लवकरच या प्रकल्पांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः ही माहिती दिली अशी.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणालेत की हे DPR आता मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवले जाणार आहेत.

येत्या 10 जून रोजी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रस्तावाला मंजुरी मिळल्यानंतर कामांना गती मिळणार आहे.

लवकरच निधी मंजूर होणार 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या सदरील बैठकीत कागल ते शेंद्रे मार्गाच्या सहापदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असतानाच सांगली फाटा ते उचगाव, तावडे हॉटेल ते सीपीआर चौक, शिवाजी पूल ते गगनबावडा रोड या मार्गांवरील उड्डाणपुलांसाठी डीपीआर सादर करण्यात आले होते.

शिवाजी पूल ते केर्ली दरम्यान दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्याचा निचरा करण्यासाठीही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. तसेच, सांगली फाटा ते उचगावदरम्यान भरावाऐवजी पिलर टाकून पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा सुद्धा DPR रेडी झालाय.

तसेच, सातारा-कागल महामार्गावरील कागल शहरातील उड्डाणपूल आणि पंचगंगा नदीवरील बास्केट ब्रिजसाठीचा डीपीआर सुद्धा रेडी असून या संबंधित प्रकल्पांसाठी निधी मिळवण्यासाठीचा प्रस्ताव पुढील 15 दिवसांत केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर जूनअखेर निविदा प्रक्रिया सुरू होईल असाही दावा करण्यात आला आहे.