Pune Expressway News : गेल्या दहा वर्षांच्या काळात भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर खूपच मजबूत झाले आहे यात शंकाच नाही. मात्र काही गोष्टी अशा आहेत ज्या की अजून बदललेल्या नाहीत. पुण्यातील वाहतूक कोंडी देखील अशीच एक गोष्ट आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही या शहराला ओळखले जाते.
अलीकडे मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी पुण्यात बसतात बसवली असल्याने याला आयटी हब म्हणूनही ओळख मिळू लागली आहे. मात्र या ओळखीसोबतच पुणे आणखी एका गोष्टीसाठी कुख्यात बनत चाललय आणि ती गोष्ट म्हणजे पुण्यातील वाहतूक कोंडी. ही वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत मात्र हे प्रयत्न तोकडे ठरतायेत.

अशातच, आता पुणे-नगर महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी शिरूर-हवेलीकरांसाठी सर्वाधिक खास राहणार आहे.
खरे तर पुणे-नगर महामार्गावर या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यामुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हेच कारण आहे की आता ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी एक प्लॅन रेडी केला असल्याचे समजत आहे.
अजित दादांनी सांगितल्याप्रमाणे या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ते एक जम्बो पूल तयार करणार आहेत. आगामी काळात पुणे-नगर रोड वरील संपूर्ण वाहतूक कोंडी संपवण्यासाठी जंबो फ्लाय ओव्हर करण्याची गॅरंटी देतो असे आश्वासन अजित पवारांनी दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीशिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील जन सन्मान यात्रेत ही घोषणा केली आहे. शिरूर-हवेलीकरांची सर्वात मोठी डोकेदुखी असलेली पुणे-नगर रोडची वाहतूक कोंडी आपण जंबो फ्लाय ओव्हरने दूर करू असे अजितदादांनी म्हटले आहे.
शिरूर वाघोलिकरांना ट्रॅफिक मुक्त करणार म्हणजे करणार असे आश्वासन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. यामुळे आता या जम्बोफ्लाय ओवर प्रकल्पाबाबत आगामी काळात काय निर्णय होतो हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल कधी रेडी होईल आणि या प्रकल्पाला कधी मंजुरी मिळेल याकडे सर्वांचेचं लक्ष राहणार आहे.