Pune Goa Flight : सध्या उन्हाळी सुट्ट्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लवकरच विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या शाळा 9 जून पासून आणि राज्य बोर्डाच्या शाळा 16 जून पासून सुरु होणार असल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान उन्हाळी सुट्ट्या अंतिम टप्प्यात आलेल्या असल्याने आता अनेक जण पिकनिकचा प्लॅन बनवत आहेत. हेच कारण आहे की गोव्यामध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

गोव्यातील नयनरम्य दृश्य, येथील नाइटलाइफ, समुद्रकिनारें, येथील उत्साही वातावरण आणि सनसेट पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा गोव्याच्या दिशेने वाढला आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पर्यटक गोव्याला पिकनिक साठी जात आहेत.
दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही गोव्याला जाणाऱ्या पुणेकरांची संख्या उल्लेखनीय आहे. अशातच आता पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे पुणे ते गोवा हा विमान प्रवासाचा स्वस्त झाला आहे. कारण की एका प्रसिद्ध एअरलाइन्स कंपनीने पुणे गोवा विमान प्रवास स्वस्त केलाय.
या कंपनीने सुरू केली नवीन ऑफर
मिळालेल्या माहितीनुसार आकासा एअर कंपनीने ट्रेन पेक्षा कमी तिकीट दरात विमान प्रवास उपलब्ध करून दिला आहे. सध्या स्थितीला पुणे ते गोवा या रेल्वे मार्गावर सुरू असणाऱ्या ट्रेनच्या फर्स्ट क्लास एसीमधून प्रवास करायचा असेल तर तिकीटाचे दर 2300 रुपये आहेत.
शिवाय पुणे ते गोवा रेल्वे प्रवासासाठी जवळपास 12 तासांचा वेळ लागतो. मात्र आकासा एअरलाइन्सने एक जुलै 2025 रोजी पुणे गोवा विमान प्रवास फक्त 2230 रुपयांना उपलब्ध करून दिला आहे.
कस असणार वेळापत्रक?
आकासा एअरची फ्लाइट 1 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 05:25 मिनिटांनी पुणे विमानतळावरून निघणार आहे आणि सहा वाजून 35 मिनिटांनी गोव्यात लँड होणार आहे. दरम्यान, आकासा एअरलाइन्स कंपनीची ही ऑफर फक्त एक जुलै पुरतीच मर्यादित राहणार आहे.
नक्कीच ज्या लोकांना पुण्याहून गोव्याला पिकनिक साठी जायचे असेल त्यांच्यासाठी ही ऑफर फायद्याची ठरणार आहे. जर तुम्ही गोव्याला जाणार असाल तर एक जुलै रोजी प्रवास करायला हवा जेणेकरून तुमचे पैसे वाचतील. दरम्यान या ऑफरची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही संबंधित एअरलाइन्स कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देणे आवश्यक आहे.