गोव्याला जाणार आहात का ? पुणे ते गोवा विमान प्रवास झाला स्वस्त ! आता ट्रेनच्या तिकीट दरात विमानाने प्रवास करता येणार

तुम्हालाही पुण्याहून गोव्याला जायचे आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर काही विमान कंपन्यांकडून पुणे ते गोवा या प्रवासावर विशेष सवलत दिली जात आहे. दरम्यान आज आपण अशाच एका भन्नाट ऑफरची माहिती पाहणार आहोत ज्यामुळे ट्रेनच्या तिकीट दरात प्रवाशांना विमानाचा प्रवास करता येणार आहे.

Published on -

Pune – Goa Travel : सध्या भारतात उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि अनेक जण उन्हाळी पिकनिक साठी गोव्याला जाण्याचा तयारीत आहेत. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गोव्याला मोठी गर्दी असते. यंदाही गोव्याला पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

दरम्यान जर तुम्हालाही गोव्याला जायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणेकरांसाठी अधिकार ठरणार आहे कारण की पुणे ते गोवा हा विमान प्रवास आता स्वस्त झाला आहे.

पुणे ते गोवा असा विमान प्रवास काही एअरलाइन्स कंपनीकडून स्वस्त करण्यात आला आहे. आकासा एअर या एअरलाईन कंपनीकडून ग्राहकांना ट्रेनच्या तिकिट दरात विमान प्रवास उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

काय आहेत डिटेल्स 

खरेतर, अजूनही उन्हाळी सुट्ट्यांचा सिझन सुरूच असल्याने अनेक जण गोव्याला जाण्याचा प्लॅन बनवत आहे. पुण्यातूनही अनेक जण गोव्याला पिकनिक साठी जात आहेत. दरम्यान पुण्याहून गोव्याची ट्रिप आता खूपच स्वस्तात करता येणार आहे.

काही विमान कंपन्या पुणे ते गोवा फ्लाइट्स अवघ्या 2300 रुपयांमध्ये उपलब्ध करून देत आहेत. Akasa Air या विमान कंपनीकडून 1 जुलै 2025 रोजीची फ्लाइट फक्त 2230 रुपयांना उपलब्ध आहे.

म्हणजेच या एअरलाइन्स कंपनीच्या विमानाने अवघ्या 22 ते 30 रुपयांमध्ये पुणे ते गोवा आणि गोवा ते पुणे हा प्रवास करता येणे शक्य होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या पुणे ते गोवा असा प्रवास फर्स्ट क्लास एसीने करायचे असल्यास 2300 रुपयांचे तिकीट काढावे लागते.

महत्त्वाचे म्हणजे पुणे ते गोवा असा प्रवास जर ट्रेन नाही केला तर प्रवाशांना 12 ते 13 तास लागतात. यामुळे कमी पैशात आणि जलद गतीने प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी आकासा एअर या विमान कंपनीची फ्लाईट बेस्ट ऑप्शन राहणार आहे.

कस आहे वेळापत्रक? 

एक जुलै 2025 रोजी संध्याकाळी 05:25 मिनिटांनी आकाशाएअरची फ्लाईट पुण्यावरून उड्डाण भरणार आहे. आणि ही फ्लाईट गोव्यावरून सहा वाजून 35 मिनिटांनी उड्डाण भरणार आहे. फ्लाईटने प्रवास केल्यास प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचेल. मात्र या विमान प्रवासाचे दर फक्त एक जुलै 2025, या दिवसापुरतेच मर्यादित राहणार आहेत.

Akasa Air या विमान कंपनी प्रमाणेच इतरही कंपन्यांकडून पुणे ते गोवा हा प्रवास स्वस्तात उपलब्ध करून दिला जात आहे. इतर विमान प्रवाशांच्या तिकीट दरा बाबत जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe