Pune Highway News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड सोबतच जिल्ह्यातही रस्त्यांची अनेक कामे सुरू आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या काही दिवसांनी सुरू होण्याची शक्यता आहे. कारण की राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या महामार्गाला मंजुरी देण्याचा मोठा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. जाणकारांकडून प्राप्त माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तळेगाव ते चाकणदरम्यान 25 किमी लांबीचा चार पदरी उन्नत मार्ग आणि चाकण ते शिक्रापूरदरम्यान सहा पदरी रस्त्याच्या निर्मितीस मान्यता देण्यात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या या मंजुरीनंतर तळेगाव ते चाकणदरम्यान चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता बांधण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच चाकण ते शिक्रापूरदरम्यान जमिनीस समांतर सहा पदरी रस्ता तयार होणार आहे. खरे तर मार्च महिन्यात सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तळेगाव ते चाकण या पंचवीस किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित चार पदरी उन्नत रस्ते मार्गाचा उल्लेख करण्यात आला होता आणि या प्रकल्पासाठी सुमारे ६५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती सुद्धा अर्थमंत्री महोदयांनी त्यावेळी दिली होती.
दरम्यान राज्याच्या अर्थसंकल्पात उल्लेख केलेल्या या रस्ते विकासाच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळाली असल्याने आता या प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल अशी आशा आहे. दरम्यान, या निर्णयामुळे मावळ, खेड व शिरूर तालुक्यातील नागरिकांत आनंदाचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.
खरेतर, या भागात वाहतूक कोंडीची समस्या मोठी वाढली आहे, पण राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मान्यता दिली असल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या महामार्गाच्या कामासाठी येत्या काही दिवसांनी निविदा आणि भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार असून, भूसंपादनासाठी सुमारे 410 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प अखेर मार्गी लागणार असून, एमएसआयडीसीच्या माध्यमातून बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजेच बांधवापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर काम सुरू होणार आहे. नक्कीच बीओटी तत्वावर विकसित होणारा हा प्रकल्प या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम करणार असून या प्रकल्पामुळे पुण्याच्या या भागातील ट्रॅफिकची समस्या दूर होणार आहे.