मोठी बातमी ! पुणे-हुबळी नंतर पुण्याला आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार, कसा असणार नवीन गाडीचा रूट ?

पुणे-हुबळी एक्सप्रेसच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी गुरुवार वगळता सहा दिवस हुबळी-पुणे 'वंदे भारत' धावणार अशी माहिती समोर आली आहे. त्यापैकी तीन दिवस ही गाडी मिरजहून कोल्हापूरला येईल आणि कोल्हापुरातून पुन्हा मिरज आणि पुढे पुण्याला जाणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Pune Kolhapur Vande Bharat Express

Pune Kolhapur Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. खरेतर ही एक्सप्रेस देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली होती. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. सध्या ही गाडी देशातील 55 महत्वाच्या मार्गांवर सुरू आहे.

आपल्या महाराष्ट्राला सुद्धा आठ वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. विशेष बाब अशी की, आगामी काळात ही संख्या आणखी वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला 10 नवीन वंदे भारत एक्सप्रेस देणार आहेत.

यामध्ये पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेसचाही समावेश आहे. ही गाडी कोल्हापूर मार्गे चालवली जाणार आहे. खरंतर पुणे ते कोल्हापूर अशी स्वातंत्र वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी अशी कोल्हापूरकरांची मागणी आहे.

यासाठी पाठपुरावा देखील केला जात आहे. पण, पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस येत्या 15 सप्टेंबर पासून रुळावर येणार असल्याने पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात संभ्रमवस्था तयार झाली आहे.

पुणे-हुबळी एक्सप्रेसच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी गुरुवार वगळता सहा दिवस हुबळी-पुणे ‘वंदे भारत’ धावणार अशी माहिती समोर आली आहे. त्यापैकी तीन दिवस ही गाडी मिरजहून कोल्हापूरला येईल आणि कोल्हापुरातून पुन्हा मिरज आणि पुढे पुण्याला जाणार आहे.

तसेच पुण्यावरून येताना मिरजेतून कोल्हापूरला येईल, अन कोल्हापुरातून पुन्हा मिरजला जाऊन पुढे हुबळीला रवाना होणार अशी माहिती रेल्वे विभागाकडून समोर आली आहे. अशातच रेल्वेने एक नवीन अपडेट दिली आहे.

त्यानुसार पुण्याला आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. काल अर्थातच 11 सप्टेंबर 2024 ला रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकात पुणे ते कोल्हापूर अन पुणे ते हुबळी या दोन्ही गाड्यांचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

यामुळे कोल्हापूर-पुणे मार्गावर स्वतंत्र ‘वंदे भारत’ सुरू होईल, अशी शक्यता आता दाट होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत, आता आपण पुणे कोल्हापूर या वंदे भारत एक्सप्रेस चे संभाव्य वेळापत्रक थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक?

ही गाडी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तीन दिवस कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून सकाळी सव्वा आठ वाजता रवाना होईल आणि मिरज मार्गे दुपारी दीड वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. म्हणजे या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास ही गाडी अवघ्या सव्वा पाच तासात पूर्ण करणार आहे.

परतीच्या प्रवासाबाबत म्हणजेच पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रक बाबत बोलायचे झाले तर ही गाडी दुपारी सव्वा दोन वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि मिरज मार्गे सायंकाळी सात वाजून 40 मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचणार आहे. ही गाडी पाच तास 25 मिनिटात हा प्रवास पूर्ण करणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe