पुणे-दौंड मार्गावर लोकल सुरु केली नाही तर बेमुदत उपोषण, पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक !

पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर, पुणे ते दौंड या मार्गावर लोकल ट्रेन सुरू व्हावी अशी मागणी येथील नागरिकांच्या माध्यमातून सातत्याने केली जात आहे. दरम्यान आता हीच मागणी अधिक तीव्र होत असताना दिसत आहे. कारण की या मागणीसाठी आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Updated on -

Pune Local Train : मुंबई लोकल ट्रेनला मुंबईची लाईफ लाईफ म्हणून ओळखले जाते. मुंबई शहरात आणि उपनगरात लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये मेट्रो ट्रेन देखील सुरू करण्यात आली आहे. पुण्यातही लोकल धावते मात्र ही लोकल पुणे ते लोणावळा या मार्गांवर सुरु आहे.

पुणे ते लोणावळा या मार्गांवर सुरू असणाऱ्या लोकलला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. दरम्यान पुणे लोकल संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आली आहे. पुणे ते दौंड या मार्गावर लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

पुणे ते दौंड दरम्यान लोकल ट्रेन सुरू झाली नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा प्रवासी संघटनांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यामुळे आता पुणे ते दौंड मार्गावर लोकल ट्रेन सुरु होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. खरंतर या मार्गावर लोकल ट्रेन सुरू केली जाईल असे आश्वासन गेल्या अनेक वर्षांपासून दिले जात आहे.

पण अजून या आश्वासनाची रेल्वे कडून पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये फारच निराशा असून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. खरेतर, दौंड-पुणे दरम्यान लोकल सुरू करण्याच्या आश्वासनांची मालिका गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे.

या मार्गावर लोकल सुरु होईल असं आश्वासन रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वेळोवेळी दिले जात आहे. या आश्वासनांमुळे प्रवासी गेल्या अनेक वर्षांपासून या लोकल ट्रेनची वाट पाहत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे या मार्गावर इलेक्ट्रिक लोकल सुरू करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला आपल्या जमिनीही दिल्या आहेत, पण प्रत्यक्षात लोकल सुरू न होता ती केवळ कागदावरच राहिली आहे.

पुणे-दौंड लोकल ट्रेन प्रकल्प अजूनही फाईलबंदच आहे. दरम्यान, या मार्गावर लवकर लोकल सुरुवात नसल्याने प्रवाशांचे हाल होत असून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दररोजच्या प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या परिस्थितीवर आता तीव्र नाराजी व्यक्त करत पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्ष सारिका भुजबळ यांनी रेल्वे प्रशासनाला मोठा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर लवकरात लवकर दौंड-पुणे-दौंड लोकल सुरू झाली नाही, तर दैनंदिन प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना एकत्र घेऊन रेल्वे स्टेशनवर एप्रिलच्या 1 तारखेपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल.

एवढेच नाही तर रेल्वे प्रशासनाने उपोषणाच्या पाच दिवसांनंतरही अपेक्षित प्रतिसाद दिला नाही, तर सर्व प्रवाशांना सोबत घेऊन दौंड रेल्वे स्टेशनवर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असं म्हणत जन आंदोलन उभारण्याची भूमिका बोलून दाखवली आहे. यामुळे आता रेल्वे प्रवासी संघटनांच्या या इशाऱ्यानंतर रेल्वे कडून काय निर्णय होणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe