ब्रेकिंग : पुण्यातील ‘या’ भागांमधून धावणार मेट्रो, नव्या मेट्रो मार्गाचे 90 टक्के काम पूर्ण !

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शहरात आता तिसरा नवा मेट्रो मार्ग तयार केला जातोय. हा मेट्रो मार्ग जवळपास 24 किलोमीटर लांबीचा राहणार असून यामुळे शहरातील अनेक महत्त्वाचे भाग मेट्रो सोबत कनेक्ट होणार आहेत.

Published on -

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी पुणे मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहेत. शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. महा मेट्रो कडून हे दोन्ही मेट्रो मार्ग संचालित होत आहेत. महा मेट्रोच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरु करण्यात आली आहे.

या दोन्ही मेट्रो मार्गांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी कमी झाला आहे. अशातच आता पुणेकरांना तिसऱ्या मेट्रोमार्गाची भेट मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील तिसऱ्या मेट्रोमार्गाचे 90% पर्यंतचे काम पूर्ण झाले असून उर्वरित 10 टक्क्यांचे काम अगदीच युद्ध पातळीवर होत असून लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरातील हा तिसरा मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे. शहराचा मध्यवर्ती भाग म्हणजेच शिवाजीनगर या मेट्रो मार्गाने हिंजवडी या आयटी हब सोबत जोडले जाणार आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान विकसित होणारा हा मेट्रो मार्ग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच पीपीपी तत्त्वावर विकसित होतोय. हा पुण्यातील सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वामधील पहिलाच मेट्रो मार्ग असून या प्रकल्पामुळे हिंजवडी येथे कामानिमित्त जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या याच मेट्रो मार्ग प्रकल्पाच्या कामासंदर्भात अन हिंजवडी औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबाबत नुकतीच प्राधिकरणाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे. आता आपण या तिसऱ्या मेट्रोमार्गाबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

कसा असणार तिसरा मेट्रो मार्ग?

पुणे शहरातील तिसऱ्या मेट्रो मार्गाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला मान-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-3 या 23.293 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्ग प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सर्व जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती.

या मेट्रो मार्ग प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ परिसरातील राजभवन कार्यालयाजवळ 263.78 चौरस मीटर जमीन आवश्यक होती. यासाठी नोव्हेंबर 2022 मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राजभवन कार्यालयाने या जमिनीच्या हस्तांतरणाला मंजुरी दिल्यानंतर, मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संपूर्ण जमीन उपलब्ध झाली आहे.

ही मेट्रो लाइन हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी आणि शिवाजीनगर या भागांना जोडला जाणार आहे. हा मार्ग सिव्हिल कोर्ट येथे महामेट्रोच्या इतर मार्गांशी जोडला जाणार आहे.

सिविल कोर्ट आणि शिवाजीनगर मेट्रो स्थानकांना जोडण्यासाठी फूट ओव्हर ब्रिज विकसित केला जाणार असून हे काम महा मेट्रो आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून पूर्ण होणार अशी माहिती देखील या निमित्ताने समोर येत आहे.

नक्कीच शहरातील या तिसऱ्या मेट्रो मार्ग प्रकल्पाचा पुणेकरांना मोठा फायदा होणार असून यामुळे शहराच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. हा प्रकल्प शहरातील हिंजवडी भागात कामास असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक फायद्याचा ठरणार आहे यात शंकाच नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News