Pune Metro News : आज पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे सारख्या महानगरांमध्ये गणेशोत्सवाची मोठी धूम सुरु आहे. दरम्यान या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे मेट्रो प्रशासनाने मेट्रोच्या वेळापत्रकात नुकताच मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत आज आपण पुणे मेट्रो प्रशासनाने जाहीर केलेले नवीन वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी पुण्यातील नागरिक मोठ्याप्रमाणावर शहराच्या मध्य भागात येत असतात. दरम्यान याच गणेश भक्तांसाठी आता पुणे मेट्रो ने वेळापत्रकात बदल केला आहे.
पुणे मेट्रो प्रशासन गणेशोत्सवाच्या काळात मध्यरात्रीपर्यंत मेट्रो चालवणार आहे. या काळात मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी ये-जा करणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कसे असणार नवीन वेळापत्रक?
आज पासून गणेशोत्सवाचा सण सुरू होणार आहे. या अनुषंगाने पुणे मेट्रो प्रशासनाने सात ते नऊ सप्टेंबर दरम्यान सकाळी सहा ते रात्री 11 पर्यंत मेट्रो चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे मेट्रो सकाळी सहा ते रात्री 10 या कालावधीत नियमित सुरू असते.
पण आज पासून नऊ तारखेपर्यंत मेट्रो एक तास उशिरापर्यंत चालवली जाणार आहे. तसेच 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान मेट्रो सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत चालवली जाणार आहे.
एवढेच नाही तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे दिनांक 17 ते 18 सप्टेंबर दरम्यान सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत अशी 24 तास मेट्रो सेवा सुरु असणार आहे.
तसेच 18 सप्टेंबरला मेट्रो सेवा सकाळी 6 ते रात्री 10 अशी नियमित सुरु असणार आहे. मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या काळात शहरात प्रवास करणे सोयीचे होणार आहे.
गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरा घरी परतणाऱ्या नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. यामुळे पुणेकरांच्या माध्यमातून प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षीही मेट्रोच्या वेळापत्रकात असाच बदल करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या वर्षी गणेश भक्तांना या निर्णयाचा मोठा फायदा झाला होता. यंदाही प्रशासनाने असाच महत्त्वाचा बदल मेट्रोच्या वेळापत्रकात केला आहे.