Pune Metro News | पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘हा’ निर्णय ठरणार दिलासादायक

पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू असून या मार्गांमुळे पुणेकरांचा प्रवास हा फारच सुपरफास्ट झाला आहे. पुणे शहरात सुरू करण्यात आलेल्या या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात असे. या उपक्रमा अंतर्गत प्रवाशांसाठी मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी भाडेतत्वावरील ई-स्कूटर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Published on -

Pune Metro News : पुणे मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही पुणे मेट्रो ने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी मोठी दिलासादायक राहणार आहे. सध्या पुण्यात दोन मार्गांवर मेट्रो सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू असून या मार्गांमुळे पुणेकरांचा प्रवास हा फारच सुपरफास्ट झाला आहे.

दरम्यान आता शहरातील मेट्रो प्रवाशांसाठी ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणे शहरात सुरू करण्यात आलेल्या या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात असे. या उपक्रमा अंतर्गत प्रवाशांसाठी मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी भाडेतत्वावरील ई-स्कूटर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महामेट्रो प्रशासनाने पुण्यातील आनंदनगर स्थानक ते एमआयटी विद्यापीठ मार्गावर प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू केला आहे. महत्त्वाची बाब अशी की शहरातील मेट्रो स्थानक परिसरात असा उपक्रम सुरू करण्याची मागणी देखील होऊ लागली आहे. दरम्यान आता आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

काय आहेत डिटेल्स?

मिळालेल्या माहितीनुसार महा मेट्रो प्रशासन आणि पुण्यातील आनंदनगर स्थानक ते एमआयटी विद्यापीठ या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर इ स्कूटर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. जेनेसिस इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीतर्फे परवडणाऱ्या दरात ही सुविधा दिली जात आहे.

शहरातील मेट्रो स्थानक परिसरात ई-स्कूटर उपक्रम सुरू केल्यास प्रदूषणात घट होईल. सोबतच नागरिकांच्या पैशांची बचत होणार आहे. यामुळे या उपक्रमाला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असे म्हटले जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या उपक्रमा अंतर्गत ॲपद्वारे ई-स्कूटर बुक करता येइल. ई-मेल आणि आधार क्रमांकाच्या सहाय्याने ट्रॅकिंग करता येते. स्कुटरचे भाडे तीन रुपये प्रतिमिनिट आहे.

अर्ध्या युनिट चार्जिंगमध्ये स्कूटर 30 कि.मी. प्रवास करते. बुकिंग ऑनलाईन करता येते आणि भाडे सुद्धा ऑनलाइन देता येते. नक्कीच या उपक्रमामुळे या संबंधित भागातील मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान पुणे मेट्रो प्रशासनाने दहा मेट्रो स्थानकांची यादी तयार केली असून या ठिकाणी देखील हा उपक्रम सुरू करण्याचे नियोजित असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड मधील मेट्रोस्थानकांचा सुद्धा या यादीत समावेश असून या ठिकाणी देखील नागरिकांना या सेवेचा लाभ मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe