Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी शहरात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्यांच्या प्रकल्पांसोबतच मेट्रोचे देखील प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू असून लवकरच पुणे शहराला एक नवा मेट्रो मार्ग मिळणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू असून येत्या काही दिवसांनी मेट्रोचा तिसरा मार्ग देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची बातमी हाती आली आहे.

पुणे मेट्रो 3 म्हणजेच पुणेरी मेट्रो प्रकल्पाचे काम मार्च 2025 अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता ही डेडलाईन पुन्हा हुकली आहे. यामुळे हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार असा सवाल पुणेकरांच्या माध्यमातून उपस्थित होतोय.
दरम्यान आता आपण या प्रकल्पाची नवीन डेडलाईन काय आहे आणि हा प्रकल्प नेमका कसा आहे ? याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या आर्टिकल च्या माध्यमातून करणार आहोत.
कसा आहे पुणेरी मेट्रो मार्ग प्रकल्प ?
पुणेरी मेट्रो मार्ग प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित केला जात आहे. हा प्रकल्प शहरातील मध्यवर्ती भागाला अर्थात शिवाजीनगरला आयटी हब म्हणून ख्यातनाम असणाऱ्या हिंजवडीला जोडणार आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानच्या या मेट्रोमार्ग प्रकल्पालाच पुणेरी मेट्रो या नावाने ओळखले जात असून या प्रकल्पाचे काम पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर पूर्ण केले जात असून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर विकसित होणारा हा पुण्यातील पहिलाच मेट्रो मार्ग प्रकल्प आहे.
या मेट्रो मार्गाची लांबी 23.33 किलोमीटर इतकी असून आत्तापर्यंत या प्रकल्पाचे 85% इतके काम पूर्ण झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याचे उर्वरित काम देखील आता लवकरच पूर्ण होणार आहे.
हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे उर्वरित पंधरा टक्के काम येत्या काही महिन्यांनी पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या मेट्रो मार्गासाठी सप्टेंबर 2025 हेडलाईन आता निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत या मेट्रो मार्गाचे काम होईल आणि त्यानंतर हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी शक्यता आहे.