Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहिले आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा दूर व्हावा यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि यामध्ये मेट्रो प्रकल्पांचा देखील समावेश होतो.
शहरात विविध ठिकाणी उड्डाणपूल तयार केले जात आहेत सोबतच इतरही अनेक रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मेट्रोच्या विस्ताराची कामे सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान आता पुणे मेट्रोबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग सुद्धा आता मेट्रोने कनेक्ट होणार आहे आणि याचे संकेत स्वतः सीएम फडणवीस यांनी दिले आहेत. पुण्यातील ग्रामीण भाग मेट्रोच्या नकाशावर यावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून महत्त्वाचे निर्देश जारी झाले आहेत.
खरंतर मंत्रिमंडळ पायाभूत सुविधाच्या बैठकीत सीएम फडणवीस यांनी हडपसर ते यवत दरम्यान तयार केला जाणारा उन्नत मार्गाला भैरोबा नाला पण जोडावा असे आदेश दिले आहेत.
म्हणजे हा उन्नत मार्ग हडपसर ऐवजी भैरोबा नाल्यापासून सुरू करण्याचे आणि या सोबतच हा मार्ग तयार करताना त्यावर मेट्रो मार्गाची ही तरतूद करण्यात यावी असेही आदेश दिलेत. अर्थातच पुण्याचा ग्रामीण भाग सुद्धा मेट्रोच्या नकाशावर येणार आहे.
पुणे मेट्रो भविष्यात थेट यवतपर्यंत धावणार आहे. हडपसर ते यवत मेट्रो मार्ग भैरोबा नाल्यापासून सुरू व्हावा यासाठी मोठा पाठपुरावा सुरू होता. स्थानिक आमदारांनी पावसाळी अधिवेशनात अशी आग्रही मागणी उपस्थित केली होती.
दरम्यान ही मागणी आता पूर्ण होताना दिसत आहे. हा उन्नत मार्ग हडपसर ऐवजी आता भैरोबा नाल्यापासून सुरू होणार आहे. हा एक सहा पदरी उड्डाणपूल राहणार असून याचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून केले जाणार आहे.
पुणे – सोलापूर महामार्गावर विकसित होणाऱ्या या उन्नत मार्गामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे. सध्या हडपसर यवत उन्नत मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून आता हा मार्ग भैरोबा नाल्यापासून सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
हा उन्नत मार्ग फातिमानगर भैरोबानाल्यापासून सुरू झाला तर याचा जवळपास दोन लाख नागरिकांना थेट फायदा होईल. नक्कीच या प्रस्तावित उन्नत मार्गामुळे आणि त्यावर मेट्रो मार्ग करण्याची तयारी सुरू झाल्याने या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा दूर होण्यास मदत मिळणार आहे.













