पुण्यातील ‘या’ भागात तयार होतोय भुयारी मार्ग ! मेट्रो आणि बसस्थानक जोडणाऱ्या मार्गाचे लवकरच उदघाट्न

Published on -

Pune Metro News : शिक्षणाचे माहेरघर पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. पुण्यातील एका महत्त्वाच्या भागात भुयारी मार्ग विकसित केला जातोय. स्वारगेट मेट्रो स्थानक आणि बसस्थानक जोडणारा हा भुयारी मार्ग लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

या भुयारी मार्गाचे काम आता पूर्ण झाले असून त्यामुळे वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे. स्वारगेट मेट्रोस्थानक आणि बसस्थानक यांना जोडणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.

हा भुयारी पादचारी मार्ग आता पूर्ण झालाय अन येत्या काही दिवसांनी हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. यामुळे स्वारगेट परिसरातील गर्दी आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

मेट्रो अन बसस्थानक जोडणाऱ्या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच या प्रकल्पाची तपासणी पूर्ण होणार आहे. हा मार्ग सुरू करण्यापूर्वी दिल्लीतील रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांच्याकडून याची अंतिम सुरक्षा तपासणी पार पडणे आवश्यक आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत ही तपासणी पूर्ण होऊन मार्ग सार्वजनिक वापरासाठी खुला होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवण्यात आली आहे. स्वारगेट परिसर हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे.

महामार्ग, एसटी बस सेवा, पीएमपीएमएल बसेस आणि मेट्रो यामुळे स्वारगेटमध्ये दिवसभर प्रचंड वर्दळ असते. सध्या मेट्रो स्थानकात जाण्यासाठी पादचाऱ्यांना स्वारगेट चौक ओलांडावा लागतो.

या चौकात दुचाकींपासून अवजड वाहनांपर्यंत सतत मोठी वाहतूक सुरू असते. त्यामुळे चौक ओलांडताना पादचाऱ्यांना जीव मुठीत धरावा लागतो. दररोज हजारो प्रवासी धोकादायक परिस्थितीतून रस्ता ओलांडत असल्याने सुरक्षित पर्यायाची आवश्यकता अधोरेखित होत होती.

नव्या भुयारी मार्गामुळे हा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. स्वारगेट बसस्थानक आणि मेट्रो स्थानक हे दोन्ही प्रवासी दृष्टीने मोक्याची ठिकाणे असून त्यांना भूमिगत मार्गाने जोडल्याने पादचाऱ्यांना सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.

या मार्गातून दोन्ही स्थानकांदरम्यान पावसाळा असो वा उन्हाळा, प्रवास पूर्णपणे निर्बाध आणि आरामदायी होणार आहे. पुण्यातील मेट्रो सेवा हळूहळू सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग बनत आहे.

स्वारगेटमधून शहरातील विविध भागात जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ कमी झाला असला तरी स्थानकांदरम्यान सुरक्षित जोडणीची गरज होती. हा पादचारी मार्ग सुरू झाल्यास स्वारगेट चौकातील कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होईल.

दरम्यान, मेट्रो प्रशासनाने मार्गाची अंतर्गत सुविधा, निगराणी यंत्रणा आणि सुरक्षा मानके पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. सुरक्षा तपासणीनंतर लवकरच हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News