Pune Metro News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ही अपडेट आहे पुणे मेट्रोबाबत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रो बाबत अधिक महत्त्वाची घोषणा केली आहे. पुण्यातील एक महत्त्वाचा भाग आता मेट्रो ने कनेक्ट होणार असून याबाबत स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आज सीएम फडणवीस यांच्या हस्ते कोंढवा बुद्रुक येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झाले.

श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्यावतीने कोंढवा बु. येथे हे शिवतीर्थ उभारण्यात आले आणि या शिवतीर्थाच्या लोकार्पणप्रसंगी माननीय मुख्यमंत्र्यांनी कोंढवामधील जनतेसाठी मोठी घोषणा केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोंढवा हे देखील मेट्रोच्या नकाशावर येणारे असे यावेळी सांगितले. यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा प्रवास येत्या काळात सुपरफास्ट होणारा असा विश्वास आता व्यक्त होतोय.
मेट्रोची भेट मिळाल्यास हा परिसर देखील शहराच्या इतर विकसित परिसरांमध्ये गणला जाऊ शकतो. मेट्रो नंतर या भागातील एकात्मिक विकास सुनिश्चित होण्याची शक्यता बळावली आहे.
खरेतर, श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्यावतीने कोंढवा बु. येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या उद्घाटन समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत अनेक आमदार आणि मंत्री उपस्थित होते.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील ज्येष्ठ नेते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा हजेरी लावली होती. यासोबतच आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, चेतन तुपे, मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे दिसलें.
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात कोंढवा परिसराला मेट्रोची भेट मिळणार असे उद्गार काढलेत. ते म्हणालेत की कात्रज-कोंढवा मार्गाचे काम लवकरात पूर्ण होणार आहे.
सोबतच मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. शिवाजी नगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे.
स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत आणणे आणि पुरंदर विमानतळाशी जोडणारी प्रस्तावित मेट्रोच्या माध्यमातून या भागाला जोडण्यासाठी शासन प्रयत्न करणार अशी पण माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमावेळी दिली.













