Pune Metro News : पुण्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या मेट्रो बाबत आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर व्हावी आणि शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट व्हावी यासाठी शहरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर कमी करावा आणि सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी मेट्रोची पायाभरणी करण्यात आली आहे.
सध्या शहरातील दोन मेट्रो मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी हे मेट्रो मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहेत.
यातील वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावरील येरवडा हे मेट्रोस्थानक आजपासून खुले झाले आहे. म्हणजे आता वनाझ ते रामवाडी हा मेट्रो मार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे.
या मार्गावरील मेट्रो आता पूर्ण क्षमतेने सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत धावणार आहे. खरे तर येरवडा स्थानक वगळता हा संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला होता. येरवडा स्थानकाचे काम अपूर्ण असल्याने हे स्थानक प्रवाशांसाठी खुले झाले नव्हते.
पण आज, वनाज ते रामवाडी या मार्गावरील येरवडा हे स्थानक सुद्धा सुरू झाले आहे. यामुळे शहरातील नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. या परिसरातील व्यावसायिक, नोकरदार वर्ग अन विद्यार्थ्यांचा प्रवास यामुळे आणखी सोयीचा होणार आहे.
या स्टेशनचा दर्शनी भाग ऐतिहासिक दांडी मार्चपासून प्रेरित आहे, जे की भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण अध्यायाचे प्रतीक आहे. हे स्थानक केवळ एक महत्त्वाचा वाहतूक दुवा म्हणून काम करणार नाही तर आपल्या समृद्ध वारशाची आठवण करून देणार आहे.
महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना कार्यक्षम आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून येरवडा मेट्रो स्टेशन सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे.