गुड न्युज ! Pune शहरातील ‘हा’ भाग सुद्धा आता मेट्रोने जोडला जाणार, 61 Km लांबीचे 2 मार्ग पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवणार

सध्या पुण्यात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. महा मेट्रो कडून पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे शहरातील इतरही अन्य भागांमध्ये मेट्रोचे मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत.

Published on -

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात तसेच आजूबाजूच्या परिसरातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास केंद्र सरकारची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. सध्या पुण्यात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. महा मेट्रो कडून पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू करण्यात आली आहे.

दुसरीकडे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावर मेट्रो सुरु करणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान चा मेट्रोमार्ग येत्या काही दिवसांनी पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार असून यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातून आयटी हब हिंजवडीमध्ये जाणे सोयीचे होणार आहे.

दुसरीकडे शहरातील इतरही अन्य भागांमध्ये मेट्रोचे मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. यातील काही प्रकल्प केंद्राच्या मंजुरीविना अडकून पडले आहेत. खडकवासला-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप ते वारजे या दोन मेट्रो मार्गांचे प्रस्ताव देखील केंद्राच्या मंजुरी विना अडकून आहेत.

या दोन्ही मेट्रो मार्गांची लांबी ही जवळपास 61 किमी इतकी आहे. या प्रस्तावित मेट्रो मार्गांसाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न सुद्धा सुरू केले आहेत. वित्तमंत्री अजित पवार यांनी दहा मार्च रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणात या दोन्ही मेट्रो मार्गांचा उल्लेख केला होता.

राज्य सरकारने खडकवासला-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-वारजे या दोन मेट्रो मार्गांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केले आहेत. पुण्यासह मुंबई आणि नागपूरमध्येही मेट्रो विस्ताराला चालना देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही पवार यांनी सांगितले.

दरम्यान, महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीसीएमसी-निगडी आणि स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गांच्या विस्तारीकरणाची प्राथमिक कामे सुरू झाली आहेत.

तसेच, या वर्षात 23.2 किमी लांबीच्या मेट्रो मार्गांचे काम प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे, जे पुणे शहराची सार्वजनिक वाहतुक आणखी मजबूत करणार आहे. पुणे मेट्रोचा हा विस्तार शहराच्या वाढत्या उपनगरांना जोडणारा असून वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे.

तसेच, सार्वजनिक वाहतुकीच्या सोयींमध्ये सुधारणा होऊन अधिक शाश्वत आणि वेगवान वाहतुकीला चालना मिळणार आहे. नक्कीच, केंद्र सरकारकडे मेट्रो मार्गाचे जे दोन नवीन प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत ते जर प्रस्ताव मान्य झाले तर पुणेकरांना याचा मोठा फायदा होणार आहे.

पुण्यात प्रस्तावित असणाऱ्या या 61 किलोमीटर लांबीच्या दोन मेट्रो मार्गांमुळे ज्या ठिकाणी अजून पर्यंत मेट्रो पोहोचलेली नाही तो भाग सुद्धा मेट्रो ने जोडला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe