पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुण्यातील ‘हा’ भागही आता मेट्रोने जोडला जाणार, कसा राहणार नवीन मेट्रो मार्गाचा रूट ?

सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. या दोन्ही मेट्रो मार्ग महा मेट्रोच्या माध्यमातून सुरु आहेत. दुसरीकडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानही मेट्रो मार्ग तयार केला जात असून याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.

Published on -

Pune Metro News : पुण्यातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. दुसरीकडे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी मेट्रोचे जाळे सुद्धा विकसित केले जात आहे.

सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. या दोन्ही मेट्रो मार्ग महा मेट्रोच्या माध्यमातून सुरु आहेत.

दुसरीकडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानही मेट्रो मार्ग तयार केला जात असून याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.

म्हणजेच हा सुद्धा मेट्रो मार्ग लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. असे असतांनाचं आता पुणेकरांना आणखी एका मेट्रोमार्गाची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

सिव्हिल कोर्ट ते येवलेवाडी पर्यंत नवीन मेट्रो लाईन प्रस्तावित करण्यात आली असून ही लाईन कोंडवामधूनजाणार आहे. हा प्रकल्प 2034 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल, रहदारीची कोंडी कमी होईल आणि कोंढवा परिसराचा विकास सुनिश्चित होईल अशी आशा आहे.

नवीन प्रस्तावित मेट्रो मार्ग कोंडवा बुड्रुक, कोंधवा खुर्द आणि येवलेवाडी यांच्याशी सिव्हिल कोर्टाला जोडेल. हडपसर सासवड रोड आणि हडपसर लोणी काळभोर यादरम्यानचे मेट्रो मार्गांना सुद्धा लवकरच हिरवा कंदील मिळणार आहे.

हा निर्णय पुणे येथील विधान भवन येथे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या बैठकीनंतर झालाय. आमदार चेतन तुपे यांनी शहराच्या भविष्यासाठी या मार्गांचे महत्त्व यावर यावेळी जोर दिला आहे.

नक्कीच हा मेट्रो मार्ग तयार झाला तर पुण्यातील जनतेला वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. म्हणूनच या मेट्रो मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे अशी नागरिकांची इच्छा असून हा मार्ग कधीपर्यंत पुणेकरांच्या सेवेत येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!