Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. पुणे शहरासोबतच पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा मेट्रोचे मार्ग तयार केले जात आहे. सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे या मार्गांचा विस्तार सुद्धा केला जात आहे. दरम्यान पुणे महा मेट्रोच्या माध्यमातून शहरात 42 किलोमीटर लांबीचा नवा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार असून याच नव्या मेट्रो मार्गाच्या कामाबाबत आता एक मोठे अपडेट हाती आली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणेकरांसाठी विकसित केला जाणारा हा 42 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग पूर्णपणे तयार झाल्यानंतर मुंबई-पुणे-बेंगळुरू महामार्गसोबत जोडला जाईल. महत्त्वाचे म्हणजे या नव्या मेट्रो मार्ग प्रकल्पासाठी DPR म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुद्धा सध्या अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे.
अशा परिस्थितीत आज आपण हा नवा मेट्रो मार्ग नेमका कसा राहणार ? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, या 42 किलोमीटर लांबीच्या नव्या मेट्रो मार्गासाठी गेल्यावर्षी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले.
या मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम मात्र आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसांनी या प्रकल्पाचा डीपीआर पूर्णपणे रेडी होणार आहे. हा डीपीआर तयार झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका कडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याला मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाला पुढील मंजुरीसाठी शासनाकडे पाठवले जाईल. या मेट्रो मार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर पुण्यात प्रस्तावित 42 किमी लांबीची मेट्रो लाईन निगडी-मुकई चौक-वाकड-नाशिक फाटा-चाकण या मार्गावरून जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या दापोडी ते PCMC दरम्यान महामेट्रो मेट्रोसेवा चालवत आहे. तसेच PCMC-निगडी एलिवेटेड स्ट्रेच, जो स्वारगेट-PCMC मार्गाचा विस्तार आहे, त्याचेही बांधकाम सध्या स्थितीला युद्धपातळीवर सुरू आहे. म्हणजे पिंपरी-चिंचवड परिसरातील ही मेट्रोची दुसरी लाईन राहणार आहे, ज्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांशी भागात मेट्रोने कनेक्ट होणार आहे.
42 किमी लांबीच्या नवीन मेट्रो लाईनमुळे निगडी, नाशिक रोड, भोसरी, मोशी, वाकड बायपास आणि रावेत यांसारखे प्रमुख भाग मेट्रो नेटवर्कशी जोडले जातील. असे सांगितले जात आहे की हा मेट्रो मार्ग तयार झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 70 ते 75 टक्के भाग हा मेट्रो सोबत जोडला जाणार आहे.