Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा या अनुषंगाने शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी आत्तापर्यंत दोन मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत. महा मेट्रोकडून पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच पीएमआरडीए कडून लवकरच एका नव्या मेट्रो मार्गाची सुरुवात होणार आहे. पीएमआरडी शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो मार्ग विकसित करत असून हा मेट्रो मार्ग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर विकसित केला जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे येत्या काही महिन्यांनी हा सुद्धा मेट्रो मार्ग सुरू केला जाणार आहे. पण तुम्हाला पुणे शहरातील सर्वाधिक प्रवासी असणाऱ्या टॉप पाच ठिकाणी कोणती याची माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याचा संदर्भात माहिती पाहणार आहोत.
खरंतर सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील सर्वाधिक प्रवाशांची गर्दी होणाऱ्या टॉप पाच मेट्रो स्थानकांची नावे नुकतीच महामेट्रो प्रशासनाने जाहीर केली आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील स्वारगेट, पीसीएमसी, रामवाडी, मंडई आणि पुणे स्थानक या मेट्रोस्थानकावरून दररोज लाखो लोक प्रवास करतात.
ही पुण्यातील सर्वाधिक प्रवासी असणारे टॉप 5 स्थानके आहेत. या 5 स्थानकांवरून सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे प्राधिकरणाकडून नुकतेच सांगितले गेले आहे. खरेतर, सध्या पुण्यात मेट्रोची सेवा दोन मार्गिकांवर – पर्पल आणि अॅक्वा लाईन – सुरू आहे.
म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे, यामध्ये एकूण 30 मेट्रो स्थानके असून त्यातील 5 स्थानके भूमिगत आहेत. या दोन्ही मार्गिकांची एकत्रित लांबी 33.1 कि.मी. आहे. महत्त्वाचे बाब अशी की आगामी काळात मेट्रो मार्गिकांचा आणखी विस्तार होणार आहे.
यामुळे पुण्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. दरम्यान, प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे, शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. या दोन्ही दिवशी मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासात 30 टक्के सवलत दिली जाणार आहे.
खरंतर आधी सुद्धा ही सवलत सुरू होती मात्र याचा लाभ फक्त शालेय विद्यार्थ्यांनाच मिळत होता. पण आता सर्वच सर्वसामान्य नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. यामुळे साहजिकच मेट्रो ने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार असून यामुळे प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.