पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी कामाची बातमी! म्हाडाने 6 हजार घरांसाठी जाहीर केली लॉटरी, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

म्हाडा आपल्या विविध विभागीय मंडळांच्या माध्यमातून राज्यातील अनेक भागांमध्ये घरांसाठी सोडत काढत असते. दरवर्षी म्हाडा आपल्या विविध मंडळांतर्गत लॉटरी जाहीर करते आणि यामुळे सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होते. दरम्यान पुणे मंडळाने 10 ऑक्टोबर 2024 ला 6294 घरांसाठी लॉटरी जाहीर केली. 10 ऑक्टोबरपासून या घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

Tejas B Shelar
Published:
Pune Mhada House

Pune Mhada House : मुंबई नवी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यात. यामुळे सर्वसामान्यांसाठी घर घेणे अवघड बनत चालले आहे. म्हणून अनेक जण म्हाडा कडून उपलब्ध होणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात.

म्हाडा आपल्या विविध विभागीय मंडळांच्या माध्यमातून राज्यातील अनेक भागांमध्ये घरांसाठी सोडत काढत असते. दरवर्षी म्हाडा आपल्या विविध मंडळांतर्गत लॉटरी जाहीर करते आणि यामुळे सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होते.

दरम्यान पुणे मंडळाने 10 ऑक्टोबर 2024 ला 6294 घरांसाठी लॉटरी जाहीर केली. 10 ऑक्टोबरपासून या घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. मागील दीड महिन्यांच्या काळात या घरांसाठी जवळपास 38 हजाराहून अधिक अर्ज सादर झाले आहेत.

मात्र मध्यंतरी दिवाळीच्या गडबडीमुळे आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अनेकांना इच्छा असूनही या घरांसाठी अर्ज सादर करता आले नाहीत. यामुळे पुणे मंडळाने जाहीर केलेल्या या लॉटरीसाठी अर्ज करणे हेतू मुदतवाढ मिळायला हवी अशी मागणी नागरिकांच्या माध्यमातून केली जात होती.

दरम्यान नागरिकांच्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर 10 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच घरांसाठी अनामत रक्कम भरण्याकरिता 12 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

ऑनलाइन पेमेंट,अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुद्‌त दि.12 डिसेंबरपर्यंत आहे. तर, सोडत दि. 7 जानेवारी 2025 रोजी काढण्यात येणार आहे.

म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाने काढलेल्या या पुणे मंडळाच्या सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील घरांचा सुद्धा समावेश आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत या लॉटरीत 2 हजार 340 घरे, तर म्हाडाच्या विविध योजनेतील घरांची संख्या 93 आहे, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांची संख्या 418 आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील सदनिकांची संख्या ही 3 हजार 312 आहे.

सोबतच 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील घरांची संख्या 131 एवढी ठेवण्यात आली आहे. दरम्यान पुणे मंडळाच्या या घरांसाठी ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन अधिकाऱ्यांकडून यावेळी करण्यात आले आहे.

घरांसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांसहित म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करावा असेही अधिकाऱ्यांनी यावेळी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe