पुण्यातील ‘या’ पॉश परिसरात फक्त 28 लाखात मिळणार घर ! Mhada कडून पुणेकरांना मिळणार मोठी भेट

Published on -

Pune Mhada News : पुण्यातील पॉश परिसरात सर्वसामान्य नागरिकांना आता फक्त 28 लाखांमध्ये घर उपलब्ध होणार आहे. खरेतर गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात घरांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे अजूनही अनेक जण आपल्या स्वप्नातील घरांसाठी अहोरात्र काबाडकष्ट करत आहेत. अलीकडे पुण्यात घरांची मागणी कमी झाली आहे, पण तरीही किमतीत कोणतीही कपात झालेली नाही उलट किमती सतत वाढत आहेत.

अशी परिस्थिती असतानाच आता पुण्यात घर घेऊ इच्छीणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजे म्हाडाने पुणेकरांसाठी एक नवीन गृहयोजना आणली आहे. या अंतर्गत पुण्यातील एका पॉश परिसरात परवडणाऱ्या किमतीत सर्वसामान्यांना घरांची उपलब्धता होणार आहे.

पुण्यातील वेगाने विकसित होणाऱ्या वाकड आणि हिंजवडी परिसरात म्हाडाकडून लॉटरीच्या माध्यमातून घर उपलब्ध करून दिली जात आहेत. यश्विन अर्बो सेंट्रो या खाजगी गृहनिर्माण प्रकल्पात ही घरे उपलब्ध करून दिली जात असून या घरांची किंमत 28 लाखांपासून सुरू होणार आहे.

हा गृहनिर्माण प्रकल्प भूमकर चौक, इंदिरा गांधी कॉलेज आणि मुख्य हायवेला लागून आहे. या भागाला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. या प्रकल्पाची घरे आहेत ते पाचशे ते सहाशे स्क्वेअर फूटची आहेत. या प्रकल्पातील घरे टू बीएचके आणि थ्री बीएचके आहेत.

या भागातील घरांची किंमत ही साधारणतः 80 ते 90 लाख रुपये आहे. पण म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्प योजनेतील घरांची किंमत 28.42 लाख ते 28.74 लाख रुपये आहे. म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांचा तब्बल 60 लाख रुपयांचा फायदा होणार आहे.

या भागात ज्यांना घर खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी नक्कीच म्हाडाची ही योजना एक सुवर्णसंधी ठरणार आहे. दरम्यान जर तुम्हाला ही म्हाडाचे हे घर खरेदी करायचे असेल तर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पात्र ठरणाऱ्या अर्जदारांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार आहे. या लॉटरीमध्ये विजेता ठरणाऱ्या लोकांना म्हाडा कडून घर दिले जाईल. या घरांसाठी म्हाडाने 20 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली आहे.

त्यामुळे जर तुम्हालाही या ठिकाणी घर घ्यायचं असेल तर मुदतीच्या आधीच अर्ज करावा लागणार आहे. या घरांसाठी मुदतीनंतर अर्ज करता येणार नाही यामुळे नागरिकांनी वेळेत योग्य त्या कागदपत्रांसहित अर्ज करणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe