पुण्यातील ‘या’ प्राईम लोकेशनवर असणारे 90 लाखांचे घर आता फक्त 28 लाखात ! Mhada ने जाहीर केली नवीन लॉटरी

Published on -

Pune Mhada News : तुमचेही पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आहे का मग आजची बातमी तुमच्यासाठीचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातील घर विक्रीचा आलेख घसरला असल्याचा एक अहवाल मध्यंतरी समोर आला होता. आयटी क्षेत्रात असणारी अनिश्चितता यामागे एक प्रमुख कारण असल्याचा एक निष्कर्ष सुद्धा काढण्यात आला.

परंतु घर विक्रीमध्ये कपात झाली असली तरी देखील पुण्यातील घरांच्या किमती काही कमी होत नाहीयेत. पुण्यातील घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत आणि यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सर्वसामान्यांना पुण्यात घर घेणे हे आवाक्याबाहेरचे वाटू लागले आहे.

सर्व आयुष्याची जमापुंजी खर्च करून देखील पुण्यात घर घेणे हे सर्वसामान्यांना अशक्य बनत असून अशी सगळी परिस्थिती असतानाच आता पुण्यातील सर्वसामान्यांसाठी एक नवीन सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. म्हाडा प्राधिकरणाकडून पुण्यात मोक्याच्या ठिकाणी घरांसाठी एक नवीन विशेष लॉटरी जाहीर करण्यात आली आहे,

ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना नव्वद लाखांचे घर फक्त 28 लाख रुपयांमध्ये आपल्या नावावर करता येणार आहे आणि नक्कीच ही सर्वसामान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. हे घरे पुण्यातील वाकड या पॉश परिसरात आहेत.

यामुळे जर तुम्हालाही वाकड परिसरात स्वतःचे घर घ्यायचे असेल आणि तुमचे बजेट 30 लाखांच्या जवळपास असेल तर नक्कीच म्हाडा प्राधिकरणाकडून करण्यात आलेली ही विशेष लॉटरी तुमच्यासाठी बेस्ट संधी ठरणार आहे.

पुण्यातील वाकडमधील ‘Yashwin Urbo Centro’ या प्रीमियम प्रकल्पात सर्वसामान्यांना ही घरे उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पातील 28 घरांसाठी म्हाडाकडून विशेष लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. हा प्रकल्प भूमकर चौकाजवळ तयार होतोय.

इंदिरा गांधी कॉलेजच्या परिसरात, आणि हायवे टच लोकेशनवर उभारला जाणारा हा प्रकल्प आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुप्रसिद्ध विलास जावळकर ग्रुप या प्रकल्पाचे विकासक म्हणून काम पाहत आहेत. या प्रकल्पात जी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत ती 2 BHK आणि 3 BHK आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात जी दोन बीएचके आणि तीन बीएचके घरे खाजगी बिल्डर कडून विकली जात आहे तर त्यांचे रेट जवळपास 80 ते 90 लाख रुपये आहेत. मात्र म्हाडाडाच्या फ्लॅट्सचा कार्पेट एरिया 500 ते 600 स्क्वेअर फूट असून याची किंमत फक्त 28.42 ते 28.74 लाखांदरम्यान ठेवण्यात आली आहे.

वाकड सारख्या परिसरात फक्त 28 लाखांमध्ये घर मिळवण सध्याच्या स्थितीला जवळपास अशक्य आहे पण म्हाडा तुमच्यासाठी ही संधी घेऊन येतय. दरम्यान, तुम्हाला यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 20 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe