पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! Mhada ची मोठी घोषणा, अर्ज केल्यानंतर हमखास मिळणार घर, कोणत्या भागात उपलब्ध होणार घर ? वाचा….

पुण्यात घर घ्यायचे असेल पण हवं तेवढं बजेट नसेल अन म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करून थकला असाल तर आजची बातमी तुमच्याच कामाची राहणार आहे. कारण की Mhada ने आता अर्ज केल्यानंतर हमखास घर उपलब्ध करून देण्यासाठी नवीन योजना सुरु केली आहे.

Published on -

Pune Mhada News : मुंबई, पुण्यात आपले एक हक्काचे घर असावे असे स्वप्न अनेकांनी पाहिले आहे. पण अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अशा परिस्थितीत सर्वच लोकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. दरम्यान पुण्यात घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

खरेतर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी MHADA पुणे मंडळाकडून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

यामुळे जर तुम्हीही पुण्यात Mhada चे घर शोधात असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्या कामाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा पुणे मंडळाकडून आता काही शिल्लक राहिलेल्या घरांचे वाटप ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे आता अर्ज केल्यानंतर हमखास अर्जदारांना पुण्यात म्हाडाचे घर उपलब्ध होऊ शकेल. यामुळे ही पुण्यात घर शोधणाऱ्यांसाठी नक्कीच एक सुवर्णसंधी ठरणार आहे. ही संधी सामान्य प्रवर्गातील पात्र आणि गरजू नागरिकांसाठी राहणार आहे अन यामुळेच नागरिकांच्या माध्यमातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत शिल्लक राहिलेली घरे आता पात्र अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने विक्री केली जाणार आहेत.

आता आपण यासाठीची अर्ज प्रक्रिया नेमकी कधीपासून सुरू होणार आणि यासाठी अर्ज कसा करायचा किंवा नोंदणी कशी करायची? याच संदर्भात सविस्तर माहिती पाहूयात.

कधी सुरु होणार अर्ज प्रक्रिया ?

पुणे म्हाडा मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत नागरिकांना आजपासून अर्ज भरता येणार आहे.

यासाठीची अर्ज प्रक्रिया 10 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून आता ज्या लोकांना यासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MHADA चे अधिकारी यासंदर्भात बोलताना असे सांगतात की, ही योजना पारदर्शक आहे म्हणून ज्यांना अद्याप घर मिळालेले नाही अशा नागरिकांनी आपला अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा.

तसेच पुणे म्हाडा मंडळाकडून या यादीत घरे वेळोवेळी अपडेट होत जाणार आहेत अन म्हणूनच Mhada ची वेबसाईट नियमित पाहणे सुद्धा तितकेच गरजेचे राहणार आहे. दरम्यान नागरिकांना https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News