पुणे आणि अहिल्यानगरकरांसाठी गोड बातमी ! ‘या’ 2 रेल्वे मार्गांचा डीपीआर तयार, कसे असणार नव्या Railway मार्गाचे रूट?

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अधिकार ठरणार आहे कारण की या तीन जिल्ह्यांमधील नागरिकांसाठी दोन नवे रेल्वे मार्ग विकसित होणार आहेत.

Published on -

Pune – Nagar Railway : भारतातील रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. भारतात जवळपास 7500 रेल्वे स्थानक तयार करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेली आहे. मात्र आजही देशातील काही भागांमध्ये रेल्वेचे नेटवर्क तयार झालेले नाही, अजूनही असे अनेक शहर आहेत जे एकमेकांना रेल्वेने कनेक्ट झालेले नाहीत.

यामुळे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. अशातच आता राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची आहे.

खरेतर, पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्राच्या सुवर्णत्रिकोणातील दोन महत्त्वाची शहरे आहेत. मात्र पुणे अन नाशिक दरम्यान अजूनही थेट रेल्वे मार्ग विकसित करण्यात आलेला नाही.

पण पुणे – नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.  एवढेच नाही तर पुणे ते अहिल्यानगर दरम्यान सुद्धा थेट रेल्वे मार्ग विकसित होणार आहे. दरम्यान याच प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

काय आहे डिटेल्स ? 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक आणि पुणे-अहिल्यानगर या दोन नव्या रेल्वेमार्गांचा DPR तयार करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही प्रकल्पांचा डीपीआर राज्य शासनाच्या मंजुरीसाठी सादर झालेला आहे.

आता राज्य सरकारकडून या डी पी आर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर केंद्राकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्य सरकारकडून या प्रकल्पाचा अंतिम प्रस्ताव आल्यानंतर या कामांना गती दिली जाणार असे आश्वासन देण्यात आलेले आहे.

यावेळी रेल्वेमंत्री वैष्णव यांनी पुणे नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पातील अडचणीबाबतही मोठे भाष्य केले आहे. ते म्हणालेत की, जुन्नर तालुक्यातील जीएमआरटी प्रकल्पाच्या जागेवरून उद्भवलेल्या अडचणींनंतर पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा नवा आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

दरम्यान रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानुसार पुणे-नाशिक मार्गाचा नवा आराखडा तयार करण्यात आला असून हाच डीपीआर आता राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला आहे.

दुसरीकडे पुणे-अहिल्यानगर मार्ग हा दुहेरी मार्ग राहणार असून, या प्रकल्पामुळे पुणे ते अहिल्यानगर हा प्रवास वेगवान होणार आहे. अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी देखील हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

एवढेच नाही तर यावेळी अश्विनी वैष्णव यांनी हा प्रकल्प कमीत कमी जागेत कसा होईल, यावर भर देण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले आहे. तसेच यावेळी त्यांनी दौंड-मनमाड दुहेरीकरणाचे कामही वेगाने सुरू असून, पुणे-लोणावळा मार्गावरील तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या कामालाही लवकरच गती दिली जाणार अशी माहिती सुद्धा दिली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe