पुणे, नगरकरांसाठी Good News ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन रेल्वे गाडी, कसा असणार रूट अन वेळापत्रक ? महाराष्ट्रातील कोणत्या स्टेशनवर थांबणार?

Published on -

Pune Nagar Railway News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची एक कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर एक नवीन रेल्वे गाडी सुरू केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचे अतिरिक्त गर्दी लक्षात घेता हडपसर-बिलासपूर विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यात रेल्वेला यश मिळणार आहे.

अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महत्त्वाचे म्हणजे ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबणार महाराष्ट्रातील कोणत्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे याबाबतही आज आपण माहिती पाहणार आहोत.

खरे तर ही गाडी हडपसर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे आणि अहिल्यानगर रेल्वे स्थानका मार्गे जाणार आहे.

ही गाडी नगर मार्गे धावणार असल्याने याचा फायदा नगर जिल्ह्यातील प्रवाशांना देखील होईल असा विश्वास यावेळी तज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.

कसं राहणार नव्या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी आठ नोव्हेंबरला बिलासपूर येथून सोडली जाणार आहे. आठ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता ही गाडी बिलासपूर रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि हडपसरला दुसऱ्या दिवशी बारा वाजता पोहोचणार आहे.

तसेच परतीच्या प्रवासात म्हणजेच हडपसर येथून ही गाडी 9 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता सोडली जाणार आहे आणि बिलासपुरला ही गाडी दुसऱ्या दिवशी तीन वाजून 30 मिनिटांनी पोहोचणार आहे. यामुळे हडपसर ते बिलासपुर या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होईल.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्या बाबत बोलायचं झालं तर जिल्ह्यातील अहमदनगर आणि कोपरगाव या दोन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर देखील ही गाडी थांबणार आहे.

ही विशेष ट्रेन दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग आणि रायपूर इत्यादी महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार अशी माहिती अधिकाऱ्यांकडून हाती आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News