पुणे – नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! सुरू होणार 3 विशेष एक्सप्रेस ट्रेन , वाचा सविस्तर

Pune Nagpur Railway : भारतासहित संपूर्ण विश्व नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. डिसेंबर महिना आता समाप्तीकडे चालला आहे आणि लवकरच नव्या वर्षाला सुरुवात होईल. दरम्यान नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण बाहेर पिकनिकला जाण्याचा प्लॅन बनवत आहेत.

नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही ही रेल्वेने प्रवास करण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी मध्य रेल्वे कडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेने वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन विशेष गाड्यांची सोय केली आहे. यामुळे जर तुम्हाला ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर जायचे असेल तर तुमच्यासाठी ही नक्कीच मोठी भेट ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पुणे – नागपूर, हडपसर – नागपूर आणि हडपसर – राणी कमलापती रेल्वे स्थानकादरम्यान नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

दरम्यान आता आपण या तीनही विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि या गाड्या कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार? याची माहिती आलेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे राहणार विशेष गाड्यांचे वेळापत्रक ?

हडपसर – नागपूर विशेष गाडी : ही स्पेशल गाडी 28, 30 डिसेंबर 2025 आणि एक, 4 जानेवारी 2026 रोजी हडपसर रेल्वे स्थानकावरून 03:50 मिनिटांनी सोडली जाईल आणि सकाळी 6:30 मिनिटांनी ही गाडी नागपूरला पोहोचेल.

तसेच नागपूर वरून ही गाडी 26, 29, 31 डिसेंबर 2025 आणि 2 जानेवारी 2026 रोजी सोडली जाणार आहे. या गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.

यात दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव आणि वर्धा अशा महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे.

पुणे – नागपूर विशेष गाडी : ही विशेष गाडी पुणे स्थानकातून 27, 29, 31 डिसेंबर 2025 आणि तीन जानेवारी 2026 रोजी साडेआठ वाजता सोडली जाणार आहे आणि दोन वाजून पाच मिनिटांनी ही गाडी नागपुरला पोहोचेल.

तसेच ही गाडी नागपुर स्थानकातून 28, 30 डिसेंबर 2025 आणि एक, चार जानेवारी 2026 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी पावणे बारा वाजेच्या सुमारास पुण्यात पोहोचणार आहे. हडपसर – नागपूर विशेष गाडी ज्या-ज्या स्टेशनवर थांबा घेईल त्याच स्टेशनवर ही गाडी सुद्धा थांबा घेणार अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हडपसर-राणी कमलापती : मिळालेल्या माहितीनुसार हे विशेष गाडी 28 डिसेंबर ते 11 जानेवारी 2026 दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी या कालावधीत प्रत्येक रविवारी सोडली जाईल.

हडपसर येथून ही गाडी रविवारी 7:50 ला सोडली जाणार आहे आणि त्याच दिवशी ही गाडी राणी कमलापती रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी शनिवारी सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून सोडले जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही गाडी हडपसर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.