मोठी बातमी ! ‘या’ तारखेला सुरू होणार पुणे-नाशिक महामार्गाचे काम

येत्या सात दिवसांनी अर्थातच 20 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घटू नये म्हणून मतदान होईपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवावे, अशी सूचना राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक अभियंता दिलीपराव मेदगे यांनी स्वतःही माहिती दिली आहे.

Tejas B Shelar
Published:
Pune Nashik Expressway

Pune Nashik Expressway : पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार सभांचा झंझावात सुरु आहे. दरम्यान याच निवडणुकीच्या काळात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ-अवसरी घाट ते खेड याभागात एक महिन्यापासून पूर्व बाजूचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

त्यामुळे पूर्व बाजूच्या दोन लेन बंद होतात अन यामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. आंबेगाव-जुन्नर भागात ये-जा करण्यास नागरिक टाळाटाळ करतात. दरम्यान, येत्या सात दिवसांनी अर्थातच 20 तारखेला मतदान होणार आहे.

या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घटू नये म्हणून मतदान होईपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवावे, अशी सूचना राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक अभियंता दिलीपराव मेदगे यांनी स्वतःही माहिती दिली आहे. या परिसरातील नागरिकांच्या माध्यमातून या महामार्गाचे काम काही काळ बंद केले गेले पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती.

या मार्गाचे काम बंद केले नाही तर आम्ही आंदोलन करू असाही इशारा या ग्रामस्थांकडून देण्यात आला. पुणे, भोसरी, भागात राहणारे मतदार आंबेगाव-जुन्नर तालुक्यात मतदानासाठी यावेत यासाठी या रस्त्याचे काम निवडणुकीपर्यंत बंद ठेवा अशी आग्रही मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली.

आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही आंदोलन करू अशा इशारा सुद्धा या नागरिकांकडून देण्यात आला होता. याबाबतचे पत्र आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत गोविंद शिंदे, मेदगे यांच्यासह मंचर पोलिसांना देण्यात आले होते.

यानुसार आता पुणे नाशिक महामार्गाचे काम बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती हाती आली आहे. तसेच या मार्गाचे काम निवडणूक झाल्यानंतर परत सुरु होईल असेही सांगितले गेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe