Pune Nashik Highway : अहिल्यानगर मधून जाणाऱ्या प्रस्तावित पुणे – नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्पाच्या संदर्भात नवीन अपडेट हाती आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधान परिषदेत पुणे – अहिल्यानगर – नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प बाबत आमदार सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
यावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मालेगाव बाह्यचे आमदार दादाजी दगडू भुसे यांनी उत्तरं दिले. भुसे यांनी पुणे – नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्पाचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल आणि या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर 36 महिन्यांनी म्हणजेच तीन वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती विधान परिषदेत दिली.

एवढेच नाही तर त्यांनी या महामार्गाच्या अलाइनमेंट मध्ये काही तांत्रिक कारणांमुळे बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. आता आपण मंत्री भुसे नेमके काय म्हणाले आहेत आणि या महामार्गाचे अलाइनमेंट कुठे बदलू शकते याचा तपशीलवार आढावा घेऊयात.
पुणे – नाशिक प्रवास अवघ्या अडीच तासांचा
पुणे – नाशिक औद्योगिक महामार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार आहे आणि या प्रस्तावित महामार्गामुळे पुणे ते नाशिक दरम्यान चा प्रवास अवघ्या अडीच ते तीन तासात पूर्ण करता येईल असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणालेत की हा महामार्ग प्रकल्प राज्याच्या विकासाला चालना देणारा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या नव्या महामार्गामुळे उद्योग, वाहतूक, पर्यटन, शिक्षण, शेती अशा विविध क्षेत्राला फायदा मिळणार आहे. या महामार्गामुळे यासंबंधी जिल्ह्यांमधील अनेक लहान मध्यम आणि मोठ्या उद्योगांना थेट जोडणी मिळणार आहे.
यासोबतच या संबंधित जिल्ह्यातील काही महत्त्वाचे तीर्थक्षेत्रे आणि विकासाच्या प्रगतीपथावर असणारी महत्त्वाची गावे देखील जोडली जाणार आहेत. परिणामी हा प्रकल्प मध्य महाराष्ट्रातील या तीनही जिल्ह्यांसाठी अधिक महत्त्वाचा ठरतो.
या कारणांमुळे महामार्गाचा अलाइनमेंट बदलणार
या प्रस्तावित महामार्ग प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जिरायत आणि बागायती जमिनीची भूसंपादन केले जाणार आहे. मात्र भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, भूसंपादन करताना शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही मंत्री भुसे यांनी दिली.
तसेच सदर महामार्गाच्या अलाइनमेंटदरम्यान काही तांत्रिक बाबींचा विचार करावा लागत असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणालेत की नवा औद्योगिक महामार्ग निर्माण करताना नाशिक परिसरातील लष्करी विभाग, प्रस्तावित रिंगरोड आणि सुरत-चेन्नई महामार्ग यांच्यासोबत समन्वय साधण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे.
त्यामुळे काही ठिकाणी रचनेमध्ये म्हणजे याच्या अलाइनमेंट मध्ये फेरबदल करणे अनिवार्य राहणार आणि यासाठी विशेष सल्लागार व तज्ज्ञांकडून अभ्यास करून निर्णय घेतले जातील असे भुसे यांनी यावेळी सांगितले आहे.