महाराष्ट्राला मिळणार नवा रेल्वे मार्ग, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती; पुणे – नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प बाबत मोठी अपडेट !

पुणे आणि नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कारण, पुणे ते नाशिक हा प्रवास लवकरच वेगवान होणार आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्रालयाकडून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. 

Published on -

Pune – Nashik Railway : महाराष्ट्रातील आणि देशातील दळणवळण व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. देशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रस्ते आणि रेल्वेचे असंख्य प्रकल्प सद्यस्थितीला सुरू आहेत. पुणे – नाशिक दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी या दोन्ही शहरादरम्यान एक नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे.

खरंतर पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाची शहरे आहेत. मात्र असे असतानाही अजूनही पुणे ते नाशिक दरम्यान थेट रेल्वे मार्ग बांधण्यात आलेला नाही. पण आता पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान याच प्रकल्पाच्या बाबत आता एक मोठ अपडेट हाती येत आहे.

काय आहे नवीन अपडेट? 

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाच्या बाबत नुकतेच एक महत्त्वाची माहिती दिली आहे. रेल्वेमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी नवीन अलाइनमेंट तयार केला जात असून याच नवीन अलाइनमेंटचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे, दरम्यान या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारची मंजुरी मिळताच कामाला सुरुवात केली जाईल.

या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना रेल्वेमंत्र्यांनी असे सांगितले की, पूर्वीचा प्रस्तावित मार्ग खोडद गावाजवळील (नारायणगाव पासून 15 किमी अंतरावर) मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजे GMRT च्या प्रतिबंधित क्षेत्रातून जात होता.

या प्रकल्पाजवळील 15 किलोमीटरचे क्षेत्र हे प्रतिबंधित आहे आणि याच भागातून पूर्वीचा मार्ग प्रस्तावित होता. यामुळे जर या भागातून रेल्वे जाईल, तर GMRT च्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली होती.

दरम्यान याच अनुषंगाने आता आधीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गात बदल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे. या अनुषंगाने सध्या या नव्या मार्गाचे अलाइनमेंट तयार केले जात असून याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आणि हे अलाइनमेंट पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. 

कसा आहे GMRT प्रोजेक्ट? 

GMRT बोलायचं झालं तर ही संस्था 23 देशांच्या सहकार्याने उभारलेली वैज्ञानिकदृष्ट्या एक महत्त्वाची संस्था आहे. दरम्यान याच संस्थेमुळे पुणे नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प आता महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. जी एम आर टी च्या कार्यात कोणतीही अडचण होऊ नये म्हणून पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा फेरआढावा घेतला जात असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

दरम्यान पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी जे नवीन अलाइनमेंट तयार केले जात आहे त्याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर नव्या मार्गावर काम सुरू केले जाणार आहे.

GMRT ही सुमारे 80 किमी अंतरावर पसरलेली आहे आणि ही GMRT 150 ते 1420 MHz या फ्रिक्वेन्सीवर कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच ही संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) अंतर्गत नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (NCRA) द्वारे चालवली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe