Pune Nashik Railway : पुणे – नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प बाबत एक मोठे अपडेट समोर आल आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या मार्गाचा नवीन डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा नवीन डीपीआर नुकताच पूर्ण करण्यात आला असून येत्या आठवड्याभरात हा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल अशी बातमी सुद्धा समोर आली आहे.

मध्य रेल्वे कडून पुणे – अहिल्या नगर – नाशिक या सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचा नवीन सुधारित डीपीआर तयार करण्यात आला आहे. या डीपीआरच्या प्रस्तावात ज्या कागदोपत्री त्रुटी असतील त्या त्रुटी आता येत्या सहा-सात दिवसात दूर केल्या जातील आणि त्यानंतर मग प्रत्यक्षात हा प्रस्ताव मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर होणार आहे.
नवीन डीपीआर तयार करण्याचे कारण
खरंतर हा मार्ग सुरुवातीला पुणे ते नाशिक व्हाया संगमनेर असा प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र जुन्नर तालुक्यातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प या रेल्वेमार्गाच्या मध्ये येत होता. तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी प्रकल्प म्हणजेच जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप हा जागतिक दुर्बिण संशोधन प्रकल्प पूर्वीच्या रेल्वे मार्गाच्या मध्ये येत होता.
या संवेदनशील प्रकल्पाच्या जवळून रेल्वे मार्ग तयार करणे रिस्की होते. परिणामी, या रेल्वे मार्गासाठी नव्याने डीपीआर तयार करावा अशा सूचना केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आल्यात.
जानेवारी महिन्यातील आदेश मिळालेत आणि आता याचा डीपीआर तयार झाला असल्याची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या इंजिनियर्स कडून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आणि त्यानंतर मग नवीन डीपीआर रेडी झाला.
दरम्यान आता आपण मध्य रेल्वेने तयार केलेला हा नवीन डीपीआर नेमका कसा आहे? या नव्या डी पी आर नुसार पुणे नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पाचा रूट कसा असणार याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कसा आहे रूट?
सेंट्रल रेल्वे कडून जो नवीन डीपीआर तयार करण्यात आला आहे त्या डी पी आर नुसार पुणे – नाशिक रेल्वे मार्गिकेचे एकूण अंतर 235 किलोमीटर इतके असणार आहे. नवीन डीपीआर नुसार रेल्वे लाईन संगमनेर ऐवजी शिर्डी मार्गे विकसित केली जाणार आहे.
ही नव्याने प्रस्तावित रेल्वे लाईन पुण्याहून अहिल्यानगर पर्यंत सध्याच्या पुणे – अहिल्यानगर महामार्गाला समांतर असणार आहे. तसेच शिर्डी ते नाशिक यासाठी एक नवीन मार्ग निश्चित केला जाणार अशी माहिती यावेळी समोर आली आहे.
या नव्या डी पी आर नुसार पुणे ते नाशिक हे अंतर 235 किलोमीटर असेल, पुणे ते अहिल्यानगर हे अंतर 125 किलोमीटर असेल आणि शिर्डी ते नाशिक हे अंतर 82 किलोमीटर इतके राहणार आहे.
एकंदरीत नव्या डीपीआरनुसार पुणे – अहिल्यानगर – शिर्डी – नाशिक असा हा रेल्वे मार्ग तयार होणार आहे. पण या मार्गामुळे पुणे-नाशिक या दोन शहरांमधील प्रवासाच अंतर मात्र वाढणार आहे.