Pune New Expressway : पुणेकरांना लवकरच एका नव्या मार्गाची भेट मिळणार आहे ज्यामुळे त्यांना मुंबईला जाण्यासाठी आणखी एक नवा पर्याय मार्ग मिळणार आहे. या नव्या मार्गामुळे पुणेकरांचा प्रवास फारच वेगवान होईल अशी आशा आहे. यामुळे पुणे ते मुंबई दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे.
खरे तर सध्या मराठवाड्यातील वाहनांना जर मुंबईला जायचे असेल तर यासाठी चाकण-शिक्रापूर-तळेगाव -लोणावळा हा मार्ग उपलब्ध आहे. मराठवाड्यातील जनता याच मार्गे मुंबईला जाते. पण, चाकण आणि शिरुर येथे असणाऱ्या एमआयडीसी अर्थातच औद्योगिक वसाहतीमुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते.

पुणे-नगर महामार्गावर कायमच वाहनांची गर्दी पाहायला मिळते. मात्र आता ही वाहतूक कोंडी कायमची दूर होणार आहे आणि मुंबईला जाण्यासाठी एक नवा मार्ग विकसित होणार आहे.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न पाहता या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर व्हावी या अनुषंगाने शिरूर-खेड-कर्जत असा नवा मार्ग विकसित केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रस्ताव रेडी करून राज्य शासनाकडे मान्यतेसाठी सुद्धा पाठवला आहे. येत्या काही दिवसांनी हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या समोर मांडला जाईल आणि त्यानंतर या प्रस्तावाला हिरवा झेंडा मिळेल अशी आशा आहे. दरम्यान आता आपण हा प्रकल्प नेमका कसा राहणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार नवा मार्ग?
मिळालेल्या माहितीनुसार शिरूर-कर्जत महामार्ग 135 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. शिरुर-पाबळ-राजगुरुनगर-शिरवली मार्गे पाईट-वांद्रे-कर्जत असा हा मार्ग राहणार असून याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आधीच तयार करण्यात आला आहे.
हा रस्ता पुढे पनवेल-उरणला जोडला जाणार आहे. म्हणजेच या मार्गाने थेट मुंबईत पोहोचता येणार आहे. यासाठी जवळपास 12000 कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे.
हा प्रकल्प बीओटी म्हणजेच बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर ज्याला मराठीत बांधवापरा आणि हस्तांतरित करा असे म्हणतात, या तत्त्वावर विकसित केला जाणार असून या प्रकल्पाचा पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडी या प्रकल्पामुळे दूर होईल असा विश्वास व्यक्त होतोय. हा प्रकल्प दीड वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असून या प्रकल्पाला विविध विभागाच्या मान्यता देण्यात आल्या आहेत.
विविध विभागांच्या मान्यता मिळाल्या असून, आता हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होणे बाकी आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या प्रकल्पावर शिक्कामोर्तब होणार आहे अन यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.