Pune New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत पुणे जिल्ह्यातही अनेक मोठमोठे प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून यामुळे जिल्ह्यातील रस्ते करण्यात तुम्ही मजबूत झाली आहे.
दरम्यान पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी छत्रपती संभाजीनगर-पुणे असा नवीन द्रुतगती महामार्ग प्रस्तावित करण्यात आला असून या महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत विलंब होतोय.

छत्रपती संभाजीनगर ते पुणे या प्रस्तावित द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला विलंब होत असून, पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात ती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरे तर सध्याचा छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गाचे नूतनीकरण सुद्धा करणे प्रस्तावित आहे.
यासाठी जवळपास 9000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तर दुसरीकडे या दोन्ही शहरादरम्यान नवा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून हा महामार्ग अंदाजे 25 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे.
सध्या या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनासोबतच अनेक तांत्रिक बाबींवरही विचार केला जात आहे. पण, या नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या महामार्ग प्रकल्पाचे काम पुणे ते शिरूर या 53 कि. मी. मार्गाचे सहा पदरीकरण पूर्ण झाल्यानंतरच सुरू होणार असल्याचे दिसते.
‘एनएचएआय’ने म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासाठी केलेले अलायन्मेंट कायम ठेवण्यात आले आहे. दरम्यान, झाल्टा येथे महामार्गाच्या माती परीक्षणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. खरे तर या महामार्ग प्रकल्पाची घोषणा 33 महिन्यांपूर्वीच झाली होती.
तसेच, जून 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि एनएचएआय यांच्यात हा महामार्ग प्रकल्प पूर्ण करण्यासाठी करार झाला, यानंतर या मार्गाच्या विकासाला गती मिळेल अशी आशा होते मात्र आता या प्रकल्पाचे भूसंपादन लांबणीवर पडले आहे.
या प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत बोलायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर (अहमदनगर) आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालये भूसंपादन प्रक्रियेसाठी समन्वय साधणार आहेत.
हा प्रकल्प या तिन्ही जिल्ह्यांमधून जाणार असून या संबंधित जिल्ह्यांमध्ये कृषी शिक्षण उद्योग तसेच पर्यटन क्षेत्राला या महामार्ग प्रकल्पाचा फायदा होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन तसेच पैठण तालुक्यातील काही गावांमधून हा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. पण आता बिडकीनमध्ये एका औद्योगिक प्रकल्पासाठी याच्या अलायन्मेंट बदल करण्यात येणार आहे.