पुण्याला मिळणार नवीन महामार्ग प्रकल्प ! शासनाचा अधिकृत आदेश जारी

पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार असून या नव्या मार्गाचा अधिकृत शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.

Published on -

Pune New Expressway : पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुणे जिल्ह्यात एक नवीन महामार्ग विकसित होणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी वेगवान होईल अशी आशा आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की शासनाने तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या रुंदीकरण सुधारणा प्रकल्पाला मान्यता दिली होती. दरम्यान आता याच प्रकल्पाच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. शासनाच्या वतीने या प्रकल्पासाठी अधिकृत आदेश नुकताच जाहीर केला आहे.

यामुळे आगामी काळात या प्रकल्पाचे काम सुरू होईल आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तळेगाव – चाकण – शिक्रापूर या दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण या प्रकल्पाबाबतची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा आहे प्रकल्प?

खरे तर या प्रकल्पाला नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर आता या प्रकल्पाचा अधिकृत शासना आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

आता या प्रकल्पाच्या अधिकृत शासन आदेशामुळे याची अंमलबजावणी औपचारिकरित्या सुरू होणार आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत तळेगाव ते चाकण दरम्यान चार पदरी उन्नत रस्ता व जमिनीवर चार पदरी रस्ता तयार केला जाणार आहे.

तसेच चाकण ते शिक्रापूर दरम्यान जमिनीवर सहा पदरी रस्ता विकसित करण्यात येणार अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 53.2 किमी लांबीचा मार्ग विकसित केला जाणार आहे. दरम्यान, या मार्गासाठी शासनाने 3 हजार 923.89 कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे.

प्रकल्पाचे काम कोण करणार? 

हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत विकसित केला जाणार आहे. या संबंधित प्राधिकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प 30 वर्षांच्या सवलत धोरणांतर्गत राबविण्यात येणार आहे.

महत्त्वाची बाब अशी की या प्रस्तावित प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन, पथकर वसुली आणि देखभाल व्यवस्थापनाची जबाबदारी सुद्धा एमएसआयडीसीकडेच राहणार अशी माहिती यावेळी समोर आली आहे.

या नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रकल्पामुळे मुंबई – पुणे महामार्ग समवेतच पुणे ते छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील वाहतूक सुद्धा सुरळीत होईल असा विश्वास जाणकार लोकांकडून वर्तवण्यात आलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News