पुण्याला मिळणार नवा Railway मार्ग, ‘या’ रेल्वे मार्गासाठी पुढील तीन महिन्यात भूसंपादनाचे काम पूर्ण होणार, कसा असणार रूटमॅप?

पुणे जिल्ह्यात बारामती ते फलटण दरम्यान नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीपैकी बहुतांशी जमिनी संपादित करण्यात आली असून आता फक्त 23 हेक्टर जमिनीचे संपादन बाकी आहे.

Updated on -

Pune New Railway Line : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील नागरिकांना लवकरच एका नव्या मार्गाची भेट मिळणार आहे. पुण्यातील जनतेसाठी नवा रेल्वे मार्ग तयार होणार असून यामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. पुणे जिल्ह्यात बारामती ते फलटण दरम्यान नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर बारामती ते फलटणदरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. खरंतर या रेल्वे मार्गासाठी सध्या जमीन भूसंपादनाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीपैकी बहुतांशी जमिनी संपादित करण्यात आली असून आता फक्त 23 हेक्टर जमिनीचे संपादन बाकी आहे.

जे की येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल अशी आशा आहे. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी या मार्गासाठीच्या शिल्लक राहिलेल्या 23 हेक्टर जमिनीच्या संपादनाचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती दिली आहे.

आतापर्यंत किती हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले?

मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत बारामती-फलटण रेल्वेमार्गासाठी 168 हेक्टर क्षेत्राचे संपादन करण्यात आले आहे. खरंतर या रेल्वे मार्गासाठी 191 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे.

दरम्यान यापैकी 168 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे अन उर्वरित 23 हेक्टर जमिनीच्या संपादन देखील लवकरच पूर्ण होणार आहे. यामुळे या रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती मिळणार असा विश्वास व्यक्त केला जातोय.

सध्या, या मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाच्या नोंदी सातबारा सदरी घेण्याचे काम सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले आहे. खरे तर पुणे जिल्ह्यातील या महत्वाची रेल्वे मार्ग प्रकल्पासाठीच्या भूसंपादनापोटी 281.43 कोटींचा निधी प्राप्त झाला होता.

दरम्यान, आतापर्यंत त्यातील 261.30 कोटींचे वितरण करण्यात आले असून, 20 कोटी रुपये शिल्लक आहेत. या रेल्वे मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या आणखी 23 हेक्टर जमिनीपैकी 10.66 हेक्टर जमिनीच्या संपादन येत्या तीन महिन्यात पूर्ण होणार आहे.

त्यानंतर मग उर्वरित जमिनीचे संपादन केले जाईल. साधारणता तीन महिन्यात हे सर्व काम पूर्ण होणार आहे. अन येत्या तीन महिन्यात या मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाच्या पोटी संबंधित जमीन मालकांना 20 कोटी रुपयांचे वाटप देखील केले जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe