धक्कादायक ! महाराष्ट्रात आढळलेत 88 लाख रेशन कार्डधारक संशयास्पद, संशयास्पद नागरिकांचे रेशन कार्ड होणार रद्द?

Published on -

Pune News : महाराष्ट्रातील लाखो लोकांचे नाव रेशन कार्ड च्या योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. खरे तर सध्या राज्यात मिशन सुधार अभियान हाती घेण्यात आले असून या अंतर्गत संशयास्पद रेशन कार्ड धारकांची पडताळणी केली जाणार आहे.

या अभियानाच्या माध्यमातून मृत, दुबार तसेच संशयास्पद लाभार्थ्यांना वगळण्याचे काम केले जाणार आहे. या अभियान अंतर्गत पुणे जिल्ह्यातील जवळपास 68 हजार लाभार्थी वगळले जातील अशी एक शक्यता समोर आली आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

केंद्र सरकारने आधार कार्ड आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीच्या आधारावर अशा संशयास्पद लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे.

शासनाकडून तयार करण्यात आलेली ही यादी जिल्हा न्याय उपलब्ध करून देण्यात आली असून आता जे रेशन कार्ड लाभार्थी संशयास्पद आहेत त्यांची कठोर पडताळणी होणार आहे. अशा रेशन कार्ड धारकांची पडताळणी घरोघरी जाऊन केली जाणार असून पडताळणीचे काम पुरवठा विभागाकडे सोपवण्यात आली आहे.

पुरवठा विभागात कार्यरत असणारे पुरवठा निरीक्षक अधिकारी या अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन संशयास्पद लाभार्थ्यांची पडताळणी करतील आणि अपात्र लाभार्थ्यांना रेशन कार्ड च्या योजनेतून वगळतील असा मोठा दावा यावेळी करण्यात आला आहे.

दरम्यान, या पडताळणी अंती जे लाभार्थी दोषी आढळतील किंवा सदोष आढळतील त्यांना वगळण्याचे संपूर्ण अधिकार तहसीलदार महोदयांना बहाल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने रेशन कार्ड शुद्धीकरण करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली असून यामुळे लाखो अपात्र लोक या योजनेतून वगळले जातील असा एक अंदाज समोर येतोय.

राज्यातील 88 लाखाहून अधिक रेशन कार्ड धारक लाभार्थी संशयास्पद असून आता या सर्वच लाभार्थ्यांची पडताळणी या ठिकाणी होणार आहे. आधार क्रमांकातील त्रुटीच्या आधारावर ही संख्या निश्चित झाली असून आता ज्या लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकात त्रुटी आहे त्यांची पडताळणी होणार आहे.

पुणे जिल्ह्यात एक लाख 35 हजार 112 लाभार्थी संशयास्पद आढळले होते. दरम्यान या संशयास्पद लाभार्थ्यांची पडताळणी झाल्यानंतर पुरवठा निरीक्षकांच्या माध्यमातून तहसीलदार महोदयांना जे खरोखरच संशयास्पद होते असे लाभार्थी वगळण्याची शिफारस करण्यात आली आहे.

यानुसार पुणे जिल्ह्यातील 68 लाख रेशन कार्ड धारक अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News