पुण्यातील नागरिकांसाठी खुशखबर! मेट्रोनंतर आता शहरात तयार होणार दोन नवे भुयारी मार्ग, ‘या’ भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

हा भुयारी मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विकसित केला जाणार आहे. 22 मीटर खोल आणि चार पदरी असा हा भुयारी मार्ग राहणार असून यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कायमची दूर होणार असे बोलले जात आहे. याचाच एक आढावा आजच्या या लेखातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी हा एक चिंतेचा विषय आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय. हेच कारण आहे की ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात आता विविध रस्ते विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

यातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे पुणे रिंग रोडचा. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून शहरात 172 किलोमीटर लांबीचा बाह्य पुणे रिंग रोड प्रकल्प विकसित केला जाणार असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण देखील एक अंतर्गत रिंग रोड प्रकल्प विकसित करणार आहे.

याशिवाय आता शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शहरात दोन भुयारी मार्ग तयार केले जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.

एकीकडे शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे तर दुसरीकडे आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शहरात भुयारी मेट्रो मार्ग देखील तयार होणार आहेत आणि यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सुटेल असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त होतोय.

हा भुयारी मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विकसित केला जाणार आहे. 22 मीटर खोल आणि चार पदरी असा हा भुयारी मार्ग राहणार असून यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कायमची दूर होणार असे बोलले जात आहे.

अशा परिस्थितीत आज आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तयार केले जाणारे भुयारी मार्ग नेमके कसे राहणार? याचाच एक आढावा आजच्या या लेखातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असणार प्रकल्प?

मिळालेल्या माहितीनुसार शनिवार वाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवार वाडा असे दोन भुयारी मार्ग तयार केले जाणार असून यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे.

हे भुयारी मार्ग चार पदरी राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे शहरातील या दोन्ही भूमिगत मार्गांचा डीपीआर येत्या सहा महिन्यात तयार केला जाईल अशी माहिती समोर येत आहे. यासाठी मेट्रोची सुद्धा मदत घेतली जाणार आहे.

हे भुयारी मार्ग 22 मीटर म्हणजेच जवळपास 72 फूट जमिनीखाली राहणार असल्याने त्याचा या भागातील इमारतींना कोणताच धोका पोहोचणार नाही आणि या परिसरातील वाहतूक यामुळे सुरळीत होणार आहे.

दरम्यान याच भुयारी मार्ग संदर्भात नुकतीच एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत या प्रकल्पाला गती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe