पुण्यातील ‘या’ भागात तयार होतोय आणखी एक दुमजली उड्डाणपुल ! पुढील एका महिन्यात सुरू होणार वाहतुक

पुणेकरांना आणखी एका नव्या रस्ते विकासाच्या प्रकल्पाची भेट मिळणार आहे. पुण्यात सध्या गणेशखिंड रस्त्यावर जो दुमजली उड्डाणपूल तयार केला जात आहे तो उड्डाणपूल येत्या काही दिवसांनी पुणेकरांच्या सेवेत येणार आहे.

Published on -

Pune News : पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात केल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. मोठमोठे महामार्ग, उड्डाणपूल, बोगदा प्रकल्प अशी असंख्य कामे पूर्ण करण्यात आली आहेत आणि अजूनही काही कामे सुरू आहेत. पुण्यात गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषीजी चौकात दुमजली उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले असून आता याच प्रकल्पाबाबत एक नवं अपडेट हाती आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक महिना लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तोवर पुणेकरांना या भागात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.

नियोजित वेळेनुसार 31 मार्चपूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र आता ते एप्रिल अखेरपर्यंत लांबले आहे. पी एम आर डी एच्या अधिकार्‍यांनी 30 एप्रिल पर्यंत या प्रकल्पाची एक मार्गीका सुरू होईल असे म्हटले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की हिंजवडी ते शिवाजीनगर म्हणजेच पीएमआरडीए कडून विकसित होणारा पुणेरी मेट्रोमार्ग प्रकल्पांतर्गत पीएमआरडीएने 2020 मध्ये या चौकातील जुना उड्डाणपूल पाडला होता. त्यानंतर मग नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू झाले.

हे काम जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या होत्या. मात्र, चौकातील सेवावाहिन्या स्थलांतर करण्यात झालेल्या दिरंगाईमुळे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याच्या कारणास्तव पोलिसांनी काही काळ सुरक्षा मंजुरी न दिल्याने या प्रकल्पाच्या कामात मोठा विलंब झाला.

पण आता पुढील एका महिन्यात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर गणेशखिंड रस्त्यावरील ‘ई-स्वेअर’ येथून हा पूल सुरू होतो. या पुलासाठी 42 खांब उभारण्यात येणार आहेत.

वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून मुख्य चौकात खांब न उभारता दोन खांबांमध्ये 55 मीटर लांबीचे आणि 18 ते 20 मीटर रुंदीचे ‘स्पॅन’ बसवण्याचे नियोजन आहे. मात्र, कामाची गती अपेक्षेप्रमाणे नसल्याने जानेवारी 2024, त्यानंतर ऑगस्ट, नोव्हेंबर 2024 आणि नंतर 31 मार्च 2025 अशी मुदत देण्यात आली होती.

पण आता पुन्हा एकदा या मुदतीत काम पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे 30 एप्रिल पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. येत्या महिनाभरात उड्डाणपुलाच्या एका बाजूवरील काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. मात्र, संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत औंध, बाणेर, पाषाण आणि बालेवाडी परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार एवढे मात्र नक्की.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe