Pune News : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी नवरात्र उत्सव सुरू होण्याआधीच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरतर प्रशासनाकडून दिवाळीत जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक नवीन गाडी चालवली जाणार आहे. यामुळे दिवाळीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना जलद गतीने प्रवास करता येणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून नागपूरहून अहिल्यानगर मार्गे पुण्यासाठी विशेष गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन रेल्वेने विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे.

या गाडीची सुरुवात 27 सप्टेंबर पासून होणार व नोव्हेंबर अखेरपर्यंत ही गाडी सुरू राहणार आहे. यामुळे अहिल्यानगरहुन पुणे व नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी या मार्गावरील तब्बल 14 महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार असल्याचीही माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे. दिवाळी स्पेशल गाडी नागपूर येथून दर शनिवारी रात्री 19:40 वाजता सोडली जाणार आहे.
तसेच पुण्यातून दर रविवारी 15:50 वाजता ह्या स्पेशल गाडीचे प्रस्थान होणार आहे. या विशेष गाडीच्या एकूण 20 फेऱ्या होणार आहेत. पुणे – नागपूर अशा दहा व नागपूर – पुणे अशा दहा फेऱ्यांचे रेल्वे कडून आयोजन करण्यात आले आहे.
या स्पेशल ट्रेनची अलीकडेच घोषणा झाली असून प्रवाशांकडून रेल्वेच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. दिवाळीच्या काळात होणारी संभाव्य गर्दी पाहता प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचा या मार्गावरून प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना फायदा होणार आहे.
गर्दीच्या काळात रेल्वे नेहमीच विशेष गाड्यांची घोषणा करत असते. दिवाळीतही दरवर्षी रेल्वे कडून विशेष गाड्या चालवल्या जातात आणि यंदाही रेल्वे अशाच विशेष गाड्या वेगवेगळ्या मार्गांवर चालवणार आहे.
अहिल्या नगर मार्गे धावणारी पुणे नागपूर विशेष गाडी देखील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चालवली जाणार आहे. आता आपण ही गाडी कोणत्या चौदा स्थानकावर थांबा घेणार याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊयात.
या स्थानकावर थांबणार स्पेशल ट्रेन
उरुळी
दौंड कॉर्ड लाईन
नगर
बेलापूर
कोपरगाव
मनमाड
जळगाव
भुसावळ
मलकापूर
शेगाव
अकोला
बडनेरा
धामणगाव
वर्धा